Home /News /news /

आ रा रा...खतरनाक! लॉकडाउनमध्ये तलवारीने बड्डे ; भाईसह 20 साथीदारांचे आता वाजले बारा!

आ रा रा...खतरनाक! लॉकडाउनमध्ये तलवारीने बड्डे ; भाईसह 20 साथीदारांचे आता वाजले बारा!

चक्क लॉकडाऊनमध्ये मुळशी पॅटर्न स्टाईल वाढदिवस साजरा करणाऱ्या या भाईसह त्याच्या 20 साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

    विजय कमळे-पाटील, प्रतिनिधी जालना, 20 मे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये जमावबंदीचा आदेश पायदळी तुडवत भररस्त्यावर 'मुळशी पॅटर्न' स्टाईल तलवारीने केक कापून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणे एका भाईला आणि त्याच्या पंटरांना चांगलेच महागात पडले. चक्क लॉकडाउनमध्ये 'मुळशी पॅटर्न' स्टाईल वाढदिवस साजरा करणाऱ्या या भाईसह त्याच्या 20 पंटरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांवर  आता लॉकअपमध्ये जाण्याची नामुष्की ओढावली. हेही वाचा -लॉकडाऊनच्या संकटात या महिन्यापासून मिळणार जास्त पगार, सरकारचा नवीन नियम लागू लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवत बदनापूर तालुक्यातील मांजरगाव येथील दुधना नदीच्या पुलावर सचिन तुकाराम आरसुड याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या अनेक मित्रांनी एकत्रित जमत एका दुचाकीवर केक ठेवून 2 फूट 7 इंच लांबीच्या तलवारीने केक कापत त्यांनी आपल्या भाईचा 'मुळशी पॅटर्न' स्टाईल बड्डे साजरा केला होता. एवढंच नव्हे तर या महाभागांनी त्या बड्डे सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल ही केले होते. सदर प्रकार लक्षात येताच बदनापूर पोलिसांनी सचिन आरसुडसह त्याच्या 20 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सचिन आरसुड याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली तलवार आणि दुचाकी जप्त करण्यात आली. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या