S M L

नोकरी करण्यापेक्षा गाय पाळणं चांगलं- बिप्लव देवांचा अजून एक अजब तर्क

आपल्या कामापेक्षा आपल्या वक्तव्यांमुळेच बिप्लव देव जास्त चर्चेत राहत आहेत. आता नोकरी करण्यापेक्षा गाय पाळणं जास्त फायदेशीर असल्याचा तर्क त्यांनी लावला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Apr 29, 2018 06:35 PM IST

नोकरी करण्यापेक्षा  गाय पाळणं चांगलं- बिप्लव देवांचा अजून एक अजब तर्क

29 एप्रिल: महाभारतात इंटरनेटचा  शोध लावणाऱ्या त्रिपुराच्या मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी अजून एक जावईशोध लावला आहे.  आपल्या कामापेक्षा आपल्या वक्तव्यांमुळेच बिप्लव देव जास्त चर्चेत राहत आहेत.  आता नोकरी करण्यापेक्षा गाय पाळणं जास्त फायदेशीर असल्याचा तर्क त्यांनी लावला आहे.

आज काल पदवी प्राप्त केलेली लोक नोकरीसाठी  भटकतात. पण त्यापेक्षा त्यांनी गाय पाळली आणि तिचं दुध विकलं तर दहा वर्षांत 10 लाख  कमवतील असंही ते म्हणाले. आज दुध 50 रूपये लिटर  झालंय  याबद्दल त्यांनी दु:खही व्यक्त केलं तर भारतातल्या प्रत्येक घरात एक गाय असावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

याआधी महाभारत काळात इंटरनेट होतं,तसंच विश्वसुंदरी डायना हेडन सुंदर नाहीच अशा विधानांनी आधीच बिप्लव देव वादात अडकले आहेत. आता शनिवारी अगरतालामध्ये केलेल्या या वक्तव्यामुळे ते पुन्हा गोत्यात येण्याची चिन्ह दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 29, 2018 06:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close