सैन्यातील महिला आणि राजकारणाबाबत लष्करप्रमुखांचं वादग्रस्त विधान !

सैन्यातील महिला आणि राजकारणाबाबत लष्करप्रमुखांचं वादग्रस्त विधान !

बिपीन रावत म्हणाले, '' जुन्या काळात एक बरं होतं की, लष्करात महिला आणि राजकारण या दोन विषयांवर बोलण्यास बंदी होती. पण आता काळ बदललाय, सैन्य दलातही आता बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. पण तरीही सैन्य दलाला राजकारणापासून नेहमीच दूर ठेवलं गेलं पाहिजे,''

  • Share this:

06 डिसेंबर, नवी दिल्ली : लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी महिला आणि सैन्यातील राजकीय हस्तक्षेपासंबधी एक वादग्रस्त विधान केलंय. विशेष म्हणजे देशाच्या संरक्षणमंत्री एक महिला असताना त्यांनी हे विधान केल्याने मोठं वादंग निर्माण होऊ शकतं. बिपीन रावत म्हणाले, '' जुन्या काळात एक बरं होतं की, लष्करात महिला आणि राजकारण या दोन विषयांवर बोलण्यास बंदी होती. पण आता काळ बदललाय, सैन्य दलातही आता बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. पण तरीही सैन्य दलाला राजकारणापासून नेहमीच दूर ठेवलं गेलं पाहिजे,'' नवी दिल्लीतील 'युनायटेड सर्विस इनस्टिट्यूट'च्या कार्यक्रमात ते बोलत होते.

बिपीन रावत म्हणाले, ''मला वाटतं आपण आता खूपच धर्मनिरपेक्ष वातावरणात काम करतोय, आपली लोकशाही परीपक्व आहे. पण तरीही सैन्य दलाने राजकारणापासून लांबच राहिलं पाहिजे पण आता आपण पुढे जातोय, लष्करात महिलाही दाखल होताहेत. ही चांगली बाब आहे. पण तरीही लष्कर आणि राजकारण या दोन यापुढेही लांबच राहाव्यात असं मला वाटतं''

विशेष म्हणजे याच बिपीन रावतानी काही दिवसांपूर्वी लष्करातील महिला सहभागाचं जोरदार समर्थन केलं होतं. लष्करात आता यापुढे महत्वाच्या पदांवर देखील महिलांची नियुक्ती केली असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. पण त्यांचा आजच्या भाषणातला ''इन गूड ओल्ड डेज'' हा शब्द नक्कीच खटकणारा वाटतो. त्यामुळे त्यांच्या या विधानावरून नवं वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

First published: December 6, 2017, 8:16 PM IST

ताज्या बातम्या