अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाला मिळाली प्रदर्शनाची नवी तारीख

अखेर 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमाला मिळाली प्रदर्शनाची नवी तारीख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

  • Share this:

मुंबई, ०५ एप्रिल- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिनेमावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. चीफ जस्टिस रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील बेंचने म्हटले की, ‘कोणत्या बायोपिकबद्दल बोलत आहात. आम्ही कदाचित हा बायोपिक पाहिला नाही. पण वीकेण्डमध्ये आम्ही हा बायोपिक पाहू.’ यानंतर निर्मात्यांनी सिनेमाच्या रिलीजच्या नवीन तारीखेची घोषणा केली.

या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्याच्या वकिलाच्या मागणीवर बेंचने म्हटले की, हे प्रकरण नियमित सुनावणीप्रमाणेच हाताळण्यात येईल. या याचिकेमध्ये आगामी निवडणुकांची सुनावणी होईपर्यंत बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. प्रेक्षकांचं मनं वळवण्यासाठी हा सिनेमा जाणीवपूर्वक निवडणुकांच्या काळात प्रदर्शित केला जात असल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता.

विवेक ओबेरॉयने सिनेमाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करून सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीखही सांगितली. या पोस्टरवर सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ११ एप्रिल लिहिण्यात आली आहे.

याआधी पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. मात्र सिनेमाचे दिग्दर्शक संदीप सिंग यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, सिनेमाचं प्रदर्शन पुढची तारीख येईपर्यंत थांबवण्यात आले आहे. मध्यप्रदेशच्या हायकोर्टाच्या इंदौर पीठाने बुधवारी सिनेमावर बंदी घालण्यात यावी ही याचिका रद्द केली होती.

First published: April 5, 2019, 10:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading