राजस्थानमध्ये भूकबळी? बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने तीन महिने रेशनच नाही

राजस्थानमध्ये भूकबळी? बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने तीन महिने रेशनच नाही

नियम राबवताना त्याला किमान मानवी चेहेरा असणं आवश्यक असतं याचा विसर सरकारी अधिकाऱ्यांना पडला. बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने मुंडा यांना गेली तीन महिने अन्न धान्य मिळालं नाही.

  • Share this:

जयपूर 7 जून : इंटरनेटचा उपयोग करत गरिबांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ देण्याची घोषणा सरकार वारंवार करत असतं. मात्र तंत्रज्ञानाच्या वापराचा अतिरेक केल्यामुळे आणि सरकारी खाक्या दाखवल्यामुळे राजस्थानात भूकबळीची घटना घडलीय. बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने एका गरीब कुटुंबाला तीन महिने रेशन मिळालं नाही. अन्न धान्यच न मिळाल्याने  कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय.

राजस्थान मधल्या लाथेहर या खेड्यात रामचंद्र मुंडा हे कुटुंबासोबत राहत होते. मोल मजुरी करून पोट भरणाऱ्या या कुटुंबाला रेशनच्या दुकानातून दर महिन्याला धान्य मिळतं. नवीन सरकारी धोरणानुसार सर्व रेशन धारकांची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आलीय. बनावट खातेधारक आणि काळाबाजार संपण्यासाठी सरकारनं ही निर्णय घेतला आणि त्याचा फायदाही दिसून आला.

नियमांचा अतिरेक

मात्र नियम राबवताना त्याला किमान मानवी चेहेरा असणं आवश्यक असतं याचा विसर सरकारी अधिकाऱ्यांना पडला. बायोमेट्रीक मशिन बंद असल्याने मुंडा यांना गेली तीन महिने अन्न धान्य मिळालं नाही. त्यामुळे गेली चार दिवस त्यांना काहीही खायला मिळालं नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

सरकारची सारवासारव

तर रेशन मिळालं नाही त्यामुळे भूकबळी झाल्याचं अजून दिसून आलं नाही असं स्पष्टीकरण सरकारी अधिकाऱ्यांनी दिलंय. या कुटुंबाला आयुष्यमान भारत, पंतप्रधान पेन्शन योजना अशा सगळ्या योजनांचा लाभ देण्यात आला होता असंही या अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंटरनेट नसेल तर ऑफलाईन व्यवस्था सुरळीत चालावी यासाठीही उपायोजना करण्यात येत असल्याचंही ते म्हणाले.

या घटनेनंतर राजस्थानातल्या अशोक गहेलोत यांच्या सरकारवर भाजपने टीका केलीय. राज्य सरकार गरिबांपर्यंत योजना पोहोचवित नसल्याचा आरोपही करण्यात येतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 7, 2019 04:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading