मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक !

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक !

परिणामी दांडीबहाद्दर नगरसेवकांना याचा चाप बसणार आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना आता बायोमेट्रीक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. सभागृहात प्रवेश करताना आणि घरी जाताना नगरसेवकांना हजेरी लावावी लागणार आहे. सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत याबाबातच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

याबाबतची अंमलबजावणी लवकरच  केली जाणार आहे. दरम्यान याबाबतची यंत्रणा सभागृहाच्या प्रवेशद्वारावर लावली जाईल. शिवाय सीसीटिव्ही लावला जाईल. तर बायोमेट्रिक नुसार हजेरी लागली नाही तर याचा परिणाम नगरसेवकांच्या भत्त्यावर होणार आहे. परिणामी दांडीबहाद्दर नगरसेवकांना याचा चाप बसणार आहे.

मुंबई महापालिकेच्या सभागृहात अनेक विषयांवर चर्चा केली जाते. विकास कामे मंजुर केली जातात. धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशावेळी नगरसेवकांची हजेरी अत्यंत महत्त्वाची असते. केवळ हजेरी नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते.

परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात. किंवा केवळ स्वाक्षरी पुरते येतात. अशावेळी राजकीय पक्षास अडचणीस सामोरे जावे लागते. परिणामी नगरसेवकांना वेसण घालण्यासाठी बायोमेट्रिक हजेरीची मागणी पुढे आली आहे. आणि आता त्याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

First published: June 19, 2018, 8:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading