मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एकनाथ खडसेंच्या स्वागताला गालबोट, कार्यकर्त्याच्या दुचाकीला अपघात

एकनाथ खडसेंच्या स्वागताला गालबोट, कार्यकर्त्याच्या दुचाकीला अपघात

 मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांचे स्वागत होणार होते. मात्र, खडसे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर एकच गर्दी उसळली होती.

मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांचे स्वागत होणार होते. मात्र, खडसे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर एकच गर्दी उसळली होती.

मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांचे स्वागत होणार होते. मात्र, खडसे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर एकच गर्दी उसळली होती.

     मुक्ताईनगर, 25 ऑक्टोबर : माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादीमध्ये (NCP) प्रवेश केल्यानंतर प्रथमच मुक्ताईनगरमध्ये (Muktainagar Jalgaon) त्यांचं आगमन झाले आहे. एकनाथ खडसे यांचं शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे. मात्र, या जल्लोषाला गालबोट लागले आहे. एका कार्यकर्त्याच्या (Party Worker) दुचाकीला अपघात (Bike accident) झाला आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपला जोरदार हादरा दिला आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा प्रवेश सोहळा पार पडला. त्यानंतर एकनाथ खडसे हे आपल्या होमग्राऊंड अर्थात मुक्ताईनगरकडे रवाना झाले. मुक्ताईनगर येथील खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोर एकनाथ खडसे यांचे स्वागत होणार होते. मात्र, खडसे यांचा ताफा दाखल झाल्यानंतर एकच गर्दी उसळली होती. त्याच वेळी झालेल्या गर्दीमुळे दुचाकीवर असलेल्या कार्यकर्त्यांची गाडी स्लीप झाली. या अपघातात दुचाकीवरील एक कार्यकर्ता गंभीर तर एक जण जखमी झाला आहे. त्यामुळे, खडसे यांनी भाजप खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यालयासमोरील स्वागत न स्वीकारताच परिवर्तन चौकाकडे रवाना झाले.  जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना नजीकच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहे. दरम्यान, भाजपला रामराम ठोकून 23 ऑक्टोबर रोजी  एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपचे कमळ मागे सोडत खडसेंनी आता घड्याळ हाती घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे देखील उपस्थित होत्या. तर दुसरीकडे, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भाजपला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा अनिल भाईदास पाटील यांनी गिरीश महाजन आणि भाजपला दिला आहे. आज एकनाथ खडसे यांच्या स्वागतासाठी मुक्ताईनगरमध्ये कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली आहे. ठिकठिकाणी एकनाथ खडसे यांचं फटाके फोडून स्वागत केले जात आहे. कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे झेंडे मिरवत खडसेंचं स्वागत करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या