ज्या नेत्याला मोदींना हरवायचं त्याच्या वडिलांनी वाचवलं होतं काश्मीर

ज्येष्ठ नेते आणि ओरिसाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांची आज जयंती. कुशल वैमानिक असलेल्या बीजूदांनी आपल्या धाडसाने काश्मीरला वाचवलं एवढच नाही तर इंडोनेशियालाही मोठी मदत केली.

  • Share this:

भारतीय राजकारणातले दिग्गज नेते बीजू पटनायक यांची 05 मार्चला जयंती आहे. ते जसे कुशल राजकारणी होते त्याचप्रमाणे ते धाडसी वैमानिकही होते याची फारच थोड्या लोकांना कल्पना आहे. त्याच्या लग्नात ते स्वत: डकोटा चालवत वरात घेऊन गेले होते. इंडोनेशियाच्या स्वातंत्र लढ्यातही ते पत्नीला घेऊन मदतीसाठी गेले त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त एक महिन्यांचा होता.

1947 मध्ये जेव्हा पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. त्यावेळी काश्मीर वाचविण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. ते डकोटा डी सी-3 हे विमान घेऊन श्रीनगरला गेला. त्यांच्या विमानात शीख रेजिमेंटच्या 17 सैनिकांची तुकडी होती. विमान उतरवणं धाडसाचं होतं. कारण विमानतळावर पाकिस्तानच्या सैनिकांचा वावर होता. मात्र त्यांनी धाडसाने विमान उतरवलं आणि सैनिकांनी विमानतळाला पाकिस्तानी धुसखोरांच्या तावडीतून मुक्त केलं.

वैमानिक बनावं हे बीजू पटनायक यांचं स्वप्न होतं. त्यासाठी त्यांनी आपला इतर अभ्यासही सोडला होता. सुरुवातीला त्यांनी खासगी एअरलाईन कंपनीत नोकरी केली. नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी  रॉयल इंडियन एयरफोर्स जॉईन केलं. त्यानंतर त्यांनी कलिंग एयरलाइन्सचीही स्थापना केली होती.

बीजू दांचं धाडस बघून पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी त्यांना इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य लढ्यात मदतीसाठी पाठवलं होतं. त्यावेळी इंडोनेशिया डचांच्या तावडीतून मुक्ततेसाठी प्रयत्न करत होता. ते  डकोटा विमान घेऊन तिथे गेले आणि त्यांनी इंडोनेशियन स्वातंत्र योद्ध्यांना मदत केली.

इंडोनेशियाच्या या कारवाईच्या प्रसंगी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी ज्ञान पटनायक याही सोबत होत्या. तर मुलगा नवीन फक्त 1 महिन्यांचा होता. ते आता ओरिसाचे मुख्यमंत्री आहेत. तर भाजपला तिथे खिंडार पाडायची आहे. बाजू दांनी जकार्ताहून प्रमुख बंडखोर नेते सुल्तान शहरयार आणि सुकर्णो यांना नवी दिल्लीत आणलं होतं. त्यांनी नेहरूंसोबत चर्चा केली. इंडोनेशिया स्वतंत्र झाल्यानंतर सुकार्णो तिथले पहिले राष्ट्रपती बनले. नंतर बीजूदांना इंडोनेशियाची नागरिकता आणि भूमिपूत्र हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

बीजू पटनायक यांनी ज्ञानवती यांच्याशी प्रेमविवाह केला होता. लाहोरला टेनिस कोर्टावर त्यांची भेट झाली होती. त्यांना तीन मुलं आहेत. नवीन पटनायक हे ओरिसाचे मुख्यमंत्री आहेत. तर मुलगी गीता या जगप्रसिद्ध लेखिका आहेत.

ज्ञानवती याही देशातल्या पहिल्या व्यावसायिक पायलट होत्या. 1950 च्या नेपाळच्या अंतर्गत संकटाच्या वेळीही त्या दोघांनीही तिथल्या सरकारला मोठी मदत केली होती.

1960 नंतर ते राजकारणात आले.  नंतर ते ओरिसाचे मुख्यमंत्री बनले. 1962 च्या चीन युद्धानंतर त्यांना नेहरूंनी दिल्लीत बोलावून घेतलं होतं. पंतप्रधानांना तो गोपनीय कामांमध्ये मदत करत असत.

1975 मध्ये त्यांनी आणीबाणीला विरोध केला होता. त्यांना त्या काळात अटकही करण्यात आली होती. नंतर मोरारजी देसाई पंतप्रधान असताना त्यांना केंद्रात मंत्रीपदही दिले होते.

बीजू पटनायक यांच 17 एप्रिल 1997 ला ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होत. त्यांच्या धाडसाच्या कहाण्या आजही चर्चिल्या जात असतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या