Home /News /news /

मृत समजून ज्या सुनेचं घातलं श्राद्ध, 'ती' प्रियकरासोबत पोलिसांसमोर राहिली उभी

मृत समजून ज्या सुनेचं घातलं श्राद्ध, 'ती' प्रियकरासोबत पोलिसांसमोर राहिली उभी

एकीकडे या महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप करत पोलीस चौकशीची मागणी केली असताना अचानक ही महिला आपल्या प्रियकरासोबत समोर आली.

    बिहार, 10 नोव्हेंबर : एकीकडे बिहारच्या निवडणुकांच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बिहारमध्ये एक विचित्र घटना घडली. येथील कैमूर जिल्ह्यातील सिरहीरा गावात बेपत्ता होऊन मृत घोषित करण्यात आलेली महिला चक्क जिवंत सापडली. एकीकडे या महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप करत पोलीस चौकशीची मागणी केली असताना अचानक ही महिला आपल्या प्रियकरासोबत समोर आली. या घटनेनं पोलिसची च्रकावून गेले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी ही महिला घरातून गायब झाल्यानंतर सासरच्यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र काहीच पत्ता न लागल्यामुळे त्यांनी सुनेची हत्याच झाली असल्याचे सांगत पोलिसांकडे चौकशीची मागणी केली. तपासादरम्यान मात्र पोलिसांसमोर वेगळच सत्य समोर आलं. वाचा-बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी महिलेच्या सासरच्या मंडळींनी पोलिसांना, ही महिला लग्न होऊन तीनच महिने झाल्यानंतर पैसे आणि दागिने घेऊन फरार झाली होती. एकीकडे महिलेच्या माहेरचे रोज वेगवेगळी कहाणी रचत असल्याचे लक्षात येता पोलिसांनी सर्वात आधी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपास सुरू असतानाच पोलिसांनी सुत्रांकडून कळले की ही महिला जिवंत आहे. वाचा-बॉयफ्रेंडसोबत लग्नाला केला कुटुंबियांनी विरोध, थेट होर्डिंगवर जाऊन बसली तरुणी मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या महिलेला तिच्या प्रियकरासोबत उत्तर प्रदेशातील चंदौली गावात पकडले. तिच्या घराची झ़़डती घेतल्यानंतर पोलिसांना रोख रक्कम आणि दागिने सापडले. महिलेला आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले असून, पोलीस चौकशी करत आहेत. वाचा-पुणे जिल्ह्यात महिलेचे डोळे निकामी करणारा आरोपी जेरबंद, अटकेनंतर केला अजब दावा महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती लग्न झाल्यापासून तिला मारहाण करत होता. कुटुंबियही तिला त्रास देते होते. म्हणून तिने प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन केला. दरम्यान पोलीस आता याप्रकरणी महिलेच्या सासरच्यांचीही चौकशी करणार आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Bihar, Crime news

    पुढील बातम्या