पती क्वारंटाईन तर प्रियकरासोबत वाढली पत्नीची जवळीक, रचला पळून जाण्याचा मास्टर प्लान

पती क्वारंटाईन तर प्रियकरासोबत वाढली पत्नीची जवळीक, रचला पळून जाण्याचा मास्टर प्लान

कोरोनामुळे नवऱ्याला क्वारंटानमध्ये ठेवण्यात आलं होतं. पती घरी नसल्यामुळे विवाहित स्त्री तिच्या प्रियकराच्या अधिकच जवळ आली.

  • Share this:

गूसराय (बिहार), 17 जून : लॉकडाऊनचा परिणाम आता प्रत्येकाच्या खासगी जीवनातसुद्धा दिसू लागला आहे. अशीच एक घटना पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आली जेव्हा एका विवाहित महिलेने पतीला सोडून प्रियकरासह पळून जाण्याचा कट रचला. मात्र, तिच्या पतीच्या विरोधानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केलं.

खरंतर, कोरोनामुळे नवऱ्याला क्वारंटानमध्ये ठेवण्यात आलं होतं. पती घरी नसल्यामुळे विवाहित स्त्री तिच्या प्रियकराच्या अधिकच जवळ आली. जेव्हा तिच्या लक्षात आलं की प्रियकरासोबतच्या नात्याला घरच्यांचा विरोध होईल तेव्हा तिने पळून जाण्याचा प्लान केला. पत्नी उपचार घेण्याच्या बहाण्यानं बेगूसरायला पोहोचली जिथे तिने प्रियकराला आधी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतक तिने पतीला फसवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी तिचा डाव उधळला.

पतीला धोका देऊन पळून जाणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे या प्रकारानंतर पत्नीने प्रियकरासोबत जाण्याचा हट्ट धरला तर पतीने तिला बंधनातून मोकळं करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता ग्रामपंचायत तोडगा काढणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती हा कामानिमित्त गुजरातला गेला असता लॉकडाऊन झालं. अशात त्याला क्वारंटाईनमध्ये राहावं लागलं. त्यामुळे माहेरी गेलेली पत्नी जुन्या प्रियकराच्या पुन्हा जवळ आली आणि तिने थेट त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्लान बनवला. पण त्यात पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पर्दाफाश झाला.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 17, 2020, 11:45 PM IST
Tags:

ताज्या बातम्या