Home /News /news /

सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये तापलं राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली 'ही' मागणी

सुशांतच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये तापलं राजकारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली 'ही' मागणी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून रोजी त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र, दुसरीकडे बिहारमध्ये राजकारण तापलं आहे.

    पाटणा, 14 जून: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)याने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. मात्र, दुसरीकडे बिहारमध्ये राजकारण तापलं आहे. सुशांतच्या दु:खद निधनाचं वृत्त समजताच सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं. बिहारचे मुख्‍यमंत्री नीतीश कुमार (CM Nitish Kumar) भावूक झाले. सुशांतच्या अकाली निधनानं बॉलिवूडचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालं आहे. हेही वाचा...अभिनेता सुशांत सिंह राजपूत सुसाईड, पोलिस इन्व्हेस्टिगेशनमध्ये झाला मोठा खुलासा माजी खासदार पप्‍पू पांडेय यांनी केली CBIचौकशीची मागणी... माजी खासदार पप्‍पू पांडेय यांनी सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या नातेवाईकांच सांत्वन केलं. त्यानंतर पप्पू पांडेय यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली आहे. सुशांत आत्महत्या करू शकत नाही. सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी, पप्पू पांडेय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. सुशांतच्या अकाली निधनामुळे बिहारामधील युवावर्गाचं मोठं नुकसान झालं आहे. अल्पवधीत यशोशिखरावर पोहोचला होता सुशांत... केंद्रीय मंत्री अश्‍वनी कुमार चौबे यांनी म्हटलं की, बिहारचा राहणाऱ्या सुशांत याने बॉलिवूडमध्ये अल्पावधीत यशोशिखर गाठलं होतं. त्याच्या निधनाच्या वृत्त हृदयद्रावक आहे. परमेश्वर सुशांतचा परिवार आणि चाहत्यांना दुःख सहन करण्याची शक्ति देवो.. ही प्रार्थना..! दुसरीकडे, लोकजनशक्ति पक्षाचे नेता चिराग पासवान यांनीही सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर बिहारचं नाव उज्ज्वल केलं, असं चिराग पासवान यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. हेही वाचा......आणि फोनवरून अंकिता लोखंडेला कळली सुशांतच्या आत्महत्येची बातमी तेजस्‍वी आणि मीसा यादव यांना मोठा धक्का... राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्‍वी यादव आणि खासदार मीसा यादव यांनाही सुशांत सिंहच्या मृत्यूचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनीही सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Sushant singh raajpoot, Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या