Home /News /news /

Bihar Election Result 2020: बिहार निवडणुकीत का फेल झाला एक्झिट पोलचा "चाणक्य"

Bihar Election Result 2020: बिहार निवडणुकीत का फेल झाला एक्झिट पोलचा "चाणक्य"

बिहारमध्ये 'टुडेज चाणक्य'नं तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्त्व महागठबंधनला 180 जागा मिळतील असं भाकित वर्तवलं होतं.

    नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election Result 2020) मतमोजणी सुरू आहे. बिहारमध्ये पहिला निकाल हाती आला आहे. एनडीएनं 3 जागा तर महागठबंधननं 2 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एक्झिट पोलनं (Exit polls) वर्तवलेल्या अंदाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. देशात झालेल्या 6 विधानसभा निवडणुकीबाबत एक्झिट पोलनं वर्तवलेला अंदात चुकीचा सिद्ध झाला आहे. हेही वाचा..Bihar: ‘अमेरिकेत EVM मशिन्स असत्या तर ट्रम्प हारले असते का?’ काँग्रेसची शंका बिहारमध्ये 'टुडेज चाणक्य'नं तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्त्व महागठबंधनला 180 जागा मिळतील असं भाकित वर्तवलं होतं. मात्र, बिहारमध्ये परिस्थिती या उलट दिसत आहे. नीतीश कुमार यांच्या नेतृत्त्वातील एनडीए 130 जागांवर आघाडीवर आहे. एक्झिट पोलचे अंदाज या आधीही अनेकदा चुकीचे ठरले आहेत. आता बिहार निवडणुकीबाबतही तेच झालं आहे. त्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वनीयता आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया (Social Media)वर एक बाब व्हायरल झाली होती. दररोज कोणता ना कोणता सर्व्हे समोर येतो परंतु सर्व्हे करणारी व्यक्ती कधी समोर येत नाही. त्यामुळे एक्झिट पोलचे आकडे फसवे, असतात. असा समज देखील जणमाणसात झाला आहे. या आधी गुजरात, हिमाचल, हरियाणा (Haryana), यूपी, पंजाब आणि दिल्ली निवडणुकीत (Delhi Election) एक्झिट पोलचे आकडे चुकीचे ठरले होते. एक्झिट पोलवर सवाल... एक्झिट पोल जाहिर करणाऱ्या एजन्सी दावा करतात की, एक्झिट पोल हे जनतेचं मत आहे. मात्र, हा दावा कायम खोटा ठरतो. यूपी विधानसभा निवडणुकीबाबत बोलयचं झाल्यास, कोणत्या एजन्सीनं सांगितल होतं का की भाजपला 324 जागा मिळतील. कोणी सांगितलं होतं का, की दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 70 पैकी 67 जागांवर विजय मिळेल. याचबरोबर 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. राजकीय विश्लेषक आलोक भदौरिया यांनी सांगितलं की, 'एक्झिट पोल बनावट नसतात. परंतु सँपल साइज छोटे असल्यानं त्यावर कायम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. प्रश्न हा आहे की, एखादी एजन्सी केवळ 5, 10 आणि 50 हजार लोकांशी बोलून संपूर्ण राज्याबाबत अंदाज कशी काय जाहीर करू शकते. दरम्यान, इतर विकसित देशांप्रमाणे भारतातील मतदार एवढा सजग नाही. मतदाराला कधी भाजपची भीती वाटते तर तर कधी काँग्रेस, एसपी, बीएसपी, आरजेडीची. त्यामुळे मतदार कधीही सत्य सांगत नाही. काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे? निकाला आधी विविध संस्थांचे एक्झिट पोल (Bihar Assembly Election 2020 Exit Poll ) समोर आले आहे बिहारमध्ये नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखालील एनडीए विरुद्ध तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. C Voter ने केलेल्या एक्झिट पोलमध्ये JDU आणि भाजप आघाडीसह NDA ला 116 जागा मिळतील असा दावा केला आहे. तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल, असं हा एक्झिट पोल सांगत आहे. हेही वाचा..बिहारमध्ये VVIP चेहरे पडले मागे, लंडन रिटर्न पुष्‍पम प्रिया यांना करावी लागेल वापसी विशेष म्हणजे, राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अनुपस्थितीत पक्षाची संपूर्ण धुरा त्यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांच्या खांद्यावर होती. राजद, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष या महाआघाडीकडून मुख्यमंत्रिपदासाठीही तेजस्वी यादव यांचाच चेहरा पुढे करण्यात आला. निवडणुकीच्या पूर्वी सर्व राजकीय विश्लेषक आणि निरीक्षक नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त करत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सुरुवात झाली आणि नवख्या तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा झंझावात उभा केला.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Bihar, Bihar Election

    पुढील बातम्या