दिग्विजय सिंह यांची कन्या आणि राष्ट्रीय नेमबाज श्रेयसीचा आज भाजप प्रवेश, मिळू शकते मोठी जबाबदारी

दिग्विजय सिंह यांची कन्या आणि राष्ट्रीय नेमबाज श्रेयसीचा आज भाजप प्रवेश, मिळू शकते मोठी जबाबदारी

श्रेयसीनं 2014 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत भारताचं नेत़ृत्व केलं होतं. 2018 रोजी तिने कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकही आपल्या नावे केलं होतं.

  • Share this:

पटणा, 04 ऑक्टोबर : बिहारमध्ये निवडणुकीचे (Bihar Election 2020) वारे जोरात वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत आता पूर्व केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह (Digvijay Singh) आणि माजी खासदार पुतुल कुमारी यांची कन्या राष्ट्रीय नेमबाज श्रेयसी सिंह (Shooter Shreyasi Singh) राजकारणात उतरत आहे. श्रेयसी सिंह आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार महासचिव अरूण सिंह आणि बिहार भाजप अध्यक्ष संजय जायसवाल यांच्या उपस्थितीमध्ये श्रेयसी आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहे.

श्रेयसी सिंहला भाजपकडून महत्त्वाची जबाबदारी आणि त्यासोबतच जमुई विधानसभेतून तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रीय नेमबाज म्हणून श्रेयसीची विशेष ओळख आहे. आता श्रेयसीला जमुई विधानसभेचे भाजपकडून तिकीट मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याआधी श्रेयसी सिंहने RJD पक्षात प्रवेश करेल आणि पक्षाकडून तिकीट मिळेल अशी कुजबुज होती मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून श्रेयसी भाजपात रविवारी भाजपात प्रवेश करणार आहे. भारताची खेळाडू म्हणून नावाजलेल्या श्रेयसीनं 2014 मध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत भारताचं नेत़ृत्व केलं होतं. 2018 रोजी तिने कॉमन वेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकही आपल्या नावे केलं होतं.

भाजपकडून श्रेयसीला सदस्यपद स्वीकारल्यानंतर बांका इथल्या अमरपूर किंवा जमुई विधानसभेसाठी तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. श्रेयसी सिंहची आई पुतुल कुमारी या बांका इथल्या माजी खासदार असून दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, यावेळी पुतुल कुमारी लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुतुल सिंह यांना भाजपने बाहेरचा रस्ता दाखवला. पुतुल सिंह यांना JDU चे उमेदवार गिरीधारी यादव यांच्याविरोधात बांका लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता त्यांची कन्या श्रेयसीचा भाजप प्रवेश आहे. भाजप श्रेयसीवर कोणती जबाबदारी देणार आणि कोणत्या मतदारसंघातून तिकीट देणार हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

First published: October 4, 2020, 12:39 PM IST

ताज्या बातम्या