पाटणा, 22 ऑक्टोबर : बिहारमध्ये राजकीय वारे आता वेगानं वाहात आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपनं आपलं संकल्पपत्र जाहीर केलं आहे. भाजपने असलेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन संकल्पपत्रात कोरोनाचंही राजकारण करत बिहारच्या जनतेला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये NDAचं सरकार स्थापन झाल्यास बिहारमधील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याचं आश्वासन या संकल्प पत्रात करण्यात आलं आहे.
बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसला हरवण्यासाठी आणि बिहारमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजपने संकल्पपत्रात 11 मोठ्या घोषणा केल्या आहेत. 5 सूत्र एक लक्ष असं या संकल्पपत्रात भाजपने म्हटलं आहे. बिहारमधील जनतेला मोफत कोरोनाची लस देणार, एक कोटी महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न करणार, 19 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
भारत में कम से कम 3 वैक्सीन उत्पादन की कगार पर आ गए हैं। अगर वैज्ञानिक बोलते हैं कि वैक्सीन ठीक है और उत्पादन कर सकते हैं तो हम बड़े स्तर पर उत्पादन के लिए तैयार हैं। देश में वैक्सीन का उत्पादन उस स्तर पर होगा जिससे बिहार में सबको मुफ्त में वैक्सीन मिल जाए:निर्मला सीतारमण pic.twitter.com/AkN8rIwo9y
2. मेडिकल आणि इंजिनियरिंगचं शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करून देणार
3. बिहारमध्ये 3 लाख शिक्षक भर्ती करणार
4. IT क्षेत्रात 5 वर्षात 5 लाख रोजगार निर्मिती करण्यावर भर
5. एक कोटी महिलांना आत्मनिर्भर कऱण्याचं लक्ष्य
6. एक लाख लोकांना आरोग्य विभागात नोकरी. 2024 पर्यंत दरभंगा इथे एम्स रुग्णालय सुरू करणार
7. धान आणि गहू नंतर डाळीची खरेदीही एमएसपी दराने.
8. 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घर देण्याचं वचन
9. 2 वर्षांत 15 नव्या प्रोसेसिंग उद्योगांना चालना देणार
10. 2 वर्षांत मत्स उत्पादनाला मोठ्या प्रमाणात चालना देणार
11. शेतकरी उत्पादन संघांसाठी सप्लाय चेन तयार करणार ज्यातून 10 हजार रोजगार तयार होतील.
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निर्मला सितारमण यांना NDA कडून घोषणापत्र जाहीर केलं आहे. यामध्ये बिहारच्या जनतेसाठी कोरोना काळात सत्तेवर आल्यानंतर मोफत लस देण्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. RJD ने या संकल्प पत्रावर टीका केली आहे. आम्ही जे वचन दिलं आहे ते सत्ते आल्यावर निश्चित पूर्ण करू असं निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे.