Bihar Board 12th Result 2019: आज 1 वाजता लागणार निकाल, Online असा करा चेक

Bihar Board 12th Result 2019: आज 1 वाजता लागणार निकाल, Online असा करा चेक

3 शाखेतील विद्यार्थ्यांचा आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार आहे.

  • Share this:

बिहार, 30 मार्च : Bihar Board 12th Result: बिहार बोर्ड इंटरमीडिएट परीक्षा देणाऱ्या 13 लाख विद्यार्थ्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. कारण, 3 शाखेतील विद्यार्थ्यांचा आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल लागणार आहे. बीएसईबीचे अध्यक्ष आनंद किशोर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. विज्ञान, वाणिज्य आणि कॉमर्स शाखांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.

बिहार बोर्ड परीक्षा आयोजित केल्याच्या अवघ्या 44 दिवसांत निकाल जाहीर होण्याची ही पहिली वेळ आहे. यावर्षी 12वीच्या परीक्षा 6 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2019 दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. याआधी बिहार बोर्डाचे निकाल हे मे महिन्यात जाहीर करण्यात आले होते, तर 2018ला बीएसईबी इंटरमीडिएट परीक्षांचे निकाल 6 जून रोजी जाहीर करण्यात आले होते.

BIHAR BOARD INTERMEDIATE RESULT 2019: असा पाहा ऑनलाईन निकाल

1. बिहार बोर्डाच्या अधिकृत biharboard.ac.in किंवा biharboardonline.bihar.gov.in किंवा bsebinteredu.in किंवा www.bsebbihar.com या वेबसाईट जा.

2. होमपेजवर दिलेल्या  Bihar Board intermediate result 2019 या लिंकवर क्‍ल‍िक करा.

3. एक लॉगइन पेज उघडेल.

4. तिथे तुमचा रोल नंबर आणि रोल कोड भरा.

5. Submit वर क्‍ल‍िक करा.

6. तुमचा निकाल स्‍क्रीनवर असेल.

First published: March 30, 2019, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading