नवी दिल्ली, 31 मे : लॉकडाऊनमुळे जगातील अर्थव्यवस्था आणि दिग्गज कंपन्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. परंतु त्याचा सर्वाधिक फटका भारतातील किरकोळ दुकानदारांना बसला आहे. अंदाजानुसार, सुमारे सात लाख किरकोळ किराणा दुकानं आता बंद होण्याच्या मार्गावर आली आहेत. ही दुकानं घरात किंवा रस्त्यावर आहेत. यामध्ये कोट्यवधी लोकांना रोजगार मिळाला असून त्यांची रोजची भाकर यावर अवलंबून असते.
लाईव्ह हिंदुस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, देशात सुमारे एक कोटी लहान किराणा दुकानदार आहेत. यापैकी सुमारे सहा ते सात टक्के लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात, म्हणजेच त्यांच्याकडे वाहतुकीचं कोणतंही साधन नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे त्यांना त्यांच्या दुकानात जाता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांची दुकानं दोन महिन्यांहून अधिक काळ बंद आहेत.
अधिक रूग्ण असणाऱ्या मुंबईकरांना मिळाला दिलासा, पालिकेनं दिली आनंदाची बातमी
ठप्प झालेली दुकानं पुन्हा उघडणं कठीण
लॉकडाऊन काढल्यानंतरही लहान किराणा दुकानदारांसाठी रस्ता सोपा नाही. उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, पैशांचा तुटवडा आणि ग्राहकांची कमतरता हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. सामान्यत: किराणा दुकानदार किंवा घाऊक विक्रेते किंवा ग्राहक उत्पादने कंपन्या सात ते 21 दिवस म्हणजे दोन ते तीन आठवड्यांपर्यंत उधारीवर माल पोचवतात. पण सर्वांना अर्थव्यवस्थेच्या अनिश्चिततेची भीती आहे, ज्यामुळे कोणतीही वस्तू उधार मिळणं कठीण होईल. तसंच या दुकानांचे बरेच खरेदीदार परप्रांतीय होते जे आता त्यांच्या घरी गेले आहेत. अशा परिस्थितीत ही दुकानं पुन्हा उघडणं फार कठीण जाईल.
पुण्यात एका दिवसात घटला रुग्ण वाढण्याचा आकडा, 24 तासांत मिळाली दिलासादायक बातमी
मोठ्या कंपन्यांचंही नुकसान
किरकोळ दुकाने बंद पडल्यामुळे मोठ्या कंपन्यांच्या अडचणीही वाढणार आहेत. निल्सनने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील एकूण किराणा उत्पादनांच्या विक्रीत किरकोळ किराणा दुकानात 20 टक्के वाटा आहे. किरकोळ विक्रेता संघटनेचे कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांचं म्हणणं आहे की, ही दुकानं दूध, ब्रेड, बिस्किटं, साबण, शॅम्पू आणि शीतपेयं यासह अनेक दैनंदिन पदार्थांची विक्री करतात. ज्याचं उत्पादन हे बहुतांश मोठ्या कंपन्यांमध्ये होतं. अशा परिस्थितीत लहान किराणा दुकान बंद केल्यानं मोठ्या कंपन्यांनाही त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हे आव्हान जितकं वाटतं तितकं जास्त गंभीर आहे.
Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद
संपादन - रेणुका धायबर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.