Bigg Boss Marathi 2- ‘थोबाड फोडेन,’ सुरेखा पुणेकरांनी अभिजीत बिचुकलेला खडसावले

Bigg Boss Marathi 2- ‘थोबाड फोडेन,’ सुरेखा पुणेकरांनी अभिजीत बिचुकलेला खडसावले

आज अभिजित बिचुकले यांना बिग बॉस एक कठीण टास्क देणार आहेत ज्यात त्याला त्याच्या टीममधील कोणा एका सदस्याला वैशालीच्या टीममध्ये पाठवावे लागणार आहे.

  • Share this:

लोणावळा, 03 जून- बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांनी WEEKEND चा डाव पाहिला. यात महेश मांजरेकरांनी सदस्यांना ते कुठे चुकले, कुठे बरोबर होते, कोण स्टार परफॉर्मर होतं तसंच कोणाला सुधरायची गरज हे सांगितलं. यावेळी बिग बॉस मराठी सिझन २ च्या घराचा पहिला कॅप्टन होण्याचा मान शिव ठाकरेला मिळाला. आता शिव घरच्या सदस्यांना कसं सांभाळून घेणार, घरचे सदस्य त्याचं किती ऐकणार हे या आठवड्यामध्ये पाहायला मिळेलच. पहिल्या आठवड्यात कुणीच घरी जाणार नाही हे सांगून महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांना सरप्राइज दिलं.

बॉलिवूड अभिनेत्रीकडून शिवाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट, सोशल मीडियात खळबळ

आज आठवड्याच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ‘कसं काय पाटील बरं आहे ना?’ या गाण्याने होणार. आज अभिजित बिचुकले यांना बिग बॉस एक कठीण टास्क देणार आहेत ज्यात त्याला त्याच्या टीममधील कोणा एका सदस्याला वैशालीच्या टीममध्ये पाठवावे लागणार आहे. या टास्कमुळेच सुरेखा पुणेकर आणि अभिजीत यांच्यात बाचाबाची होऊन सुरेखा यांनी बिचुकले यांना खडसावत थोबाड फोडेन असं म्हणाल्या.

प्रियकराच्या मृत्यूने कोसळली होती मिलिंद सोमणची बायको, लग्नासाठी असं मनवलं घरच्यांना

याचबरोबर आज घरात एक नवीन टास्क रंगणार आहे. या टास्कचं नाव आहे पोपटाचा पिंजरा. यात बिग बॉस सदस्यांना त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी देणार आहेत. ही संधी एका पक्षात दडलेली आहे. प्रत्येक टीमकडे विरुध्द टीमच्या सदस्यांचे पक्षी असणार आहेत. प्रत्येक बझरनंतर सदस्यांना विरुध्द टीमच्या सदस्याचा पक्षी पिंजऱ्यात बंद करायचा आहे. म्हणजेच विरुध्द टीमच्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. यावरून नेहा आणि शिवमध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या वादात कोण बरोबर होतं हे आजच्या भागात कळेलच.

रुग्णालयात भरती झाली सलमान खानची हिरोइन, PHOTO VIRAL

याशिवाय जस जसे दिवस पुढे जात आहेत वादात वाढ होताना दिसत आहे. कारण प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव हे दुसऱ्यांना खटकत आहेत. मागचा पूर्ण आठवडा विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा अत्यंत शांतपणे, सामंजसपणे सगळ्यांना सांभाळून घरात वावरताना दिसले. आज मात्र विणा आणि विद्याधर जोशींमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे. यावेळी बाप्पा जोशी ‘मी इथे कुणालाही सुधारायला आलो नाही’, असं वीणाला सांगताना दिसतील.

'जे मी भोगले ते यांना भोगायला लावू नका, मुलींना कधी डान्सर करू नका...'

या भांडणामध्ये किशोरी शहाणे आणि पराग हे दोघेही त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वादा दरम्यान अजून एक मुद्दा वीणा अधोरेखित करताना दिसणार आहे. वीणा म्हणते की, जेव्हा त्या टीमच्या मुली शिव्या देतात तेव्हा बाप्पा आपल्या मुलीने शिवी दिली, तर ठीक आहे असं म्हणतो पण तेच जर आम्ही काही बोललो तर भेदभाव होतो असंही म्हणतो, हे बरोबर नाही. दोघांमधलं हे भांडण इतक्यावरच संपलं नाही तर वीणाने विद्याधर यांना ‘तू काड्या करतोस, आग लावतो’ असे देखील सुनावले. तर वीणाला विद्याधर जोशी यांनी बिंडोक म्हटल्यामुळे ती जास्त चिडली होती.

सलमान-कॅटची खास केमिस्ट्री, भारत सिनेमानिमित्त कतरिना कैफ EXCLUSIVE

First published: June 3, 2019, 3:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading