Bigg Boss फेम बिचुकले जाणार तुरुंगात, खंडणीप्रकरणी जामीन नामंजूर

Bigg Boss फेम बिचुकले जाणार तुरुंगात, खंडणीप्रकरणी जामीन नामंजूर

खंडणी प्रकरणात जामीन नांमजूर झाल्यानंतर आता वरच्या न्यायालयात जाण्याची बिचुकलेंची तयारी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

  • Share this:

अक्षय कुडकेलवार, प्रतिनिधी

मुंबई, 22 जून : चेक बाऊंस प्रकरणी bigg boss फेम अभिजीत बिचुकलेंचा जामिन मंजूर झाला असला तरी खंडणी प्रकरणात बिचुकलेंचा जामीन नामंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत होणार आहे. खंडणी प्रकरणात जामीन नांमजूर झाल्यानंतर आता वरच्या न्यायालयात जाण्याची बिचुकलेंची तयारी असल्याची माहिती देण्यात आली आहे.

चेक बाऊंस प्रकरणाचा ठपका असल्यानं अभिजीत बिचुकलेला काही दिवसांआधी पोलिसांनी अटक होती. यावेळी बिचुकलेच्या छातीत कळ आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, यावेळी त्यांना आरोपींसारखी वागणूक न देता खास वागणूक देण्यात आल्याची माहिती मिळतही समोर आली आहे. बिचुकलेला रुग्णालयाच्या एसी रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण...

बिग बॉस मराठी-2मधील स्पर्धक अभिजीत बिचुकले याला सातारा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्स प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध सातारा न्यायालयाने वॉरंट बजावल्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. बिचुकलेच्या अटकेवर बिग बॉस मराठी-1ची विजेती मेघा धाडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. अभिजीतसारख्या स्पर्धकामुळे बिग बॉसच्या घराची प्रतिष्ठा खाली येत आहे. त्याला अटक झाली असेल तर तुरुंग हीच त्याची जागा असल्याचं मेघा धाडेनं म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी अभिजीतने अभिनेत्री रुपाली भोसले या स्पर्धकाबद्दल घरात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याच्या या विधानानंतर भाजपच्या नगरसेविकेनं अभिजीतवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्रदेखील लिहलं होतं.

या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मेघा म्हणाल्या, 'अभिजीतवर अशा प्रकारची कारवाई झाली असेल तर मला त्याचा सर्वाधिक आनंद आहे. बिग बॉसच्या घरातील ही जी व्यक्ती आहे ती त्याच लायकीची आहे. गेल्या 3 दिवसांपासून या व्यक्तीमुळे माझं रक्त सळसळत आहे. तो ज्या पद्धतीने घरात वागतोय आणि रुपालीबद्दल त्याने जे वक्तव्य केले आहे, ते सर्व लाज वाटणारे आहे. अभिजीतसारखा माणूस त्या घरात असे ही गोष्टी त्या घरासाठी कलंक असल्यासारखी आहे.'

रेल्वे कर्मचाऱ्याला WWE स्टाईलने चोपला, VIDEO व्हायरल

First published: June 22, 2019, 2:55 PM IST

ताज्या बातम्या