Home /News /news /

VIDEO: बाईकच्या इंजिनमध्ये होता भला मोठा नाग, गाडी स्टार्ट करताना असा उडाला गोंधळ

VIDEO: बाईकच्या इंजिनमध्ये होता भला मोठा नाग, गाडी स्टार्ट करताना असा उडाला गोंधळ

एका दुचाकीच्या इंजिनमध्ये सापाने मस्त बैठक मारली आहे.

    वर्धा, 04 जुलै : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अशात आता पावसाने हजेरी लावल्यामुळे हवामानात सध्या वेगळेच बदल होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. अशात वातावरणात मोठा बदल झाला. यावेळेत प्राण्यांचे आपण अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. एका दुचाकीच्या इंजिनमध्ये सापाने मस्त बैठक मारली आहे. दुचाकी सुरू करताना पटकन त्याच्याकडे लक्ष गेलं आणि मोठा अनर्थ टळला. इंजिनमध्ये लपून बसलेल्या सापाला पाहून पोलिसही हबकले. हा प्रकार वर्ध्यामध्ये घडला आहे. त्याचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. खरंतर, पावसाळ्याचे दिवस असल्याने कुठे, काय असेल याचा नेम राहिला नाही. वर्ध्याच्या शहर पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी आपली ड्युटी संपवून दुचाकीजवळ जात गाडी सुरू करत होता. तोच त्यांचं लक्ष इंजिनकडे गेलं तर नागराज बैठक मारून बसले होते. अचानक नाग पाहिल्याने ते खूप घाबरले. यानंतर, पोलिसांनी लागलीच सर्पमित्र यांना बोलून नागराजाला बाहेर काढलं. हा प्रकार जवळपास एक तास सुरू होता. म्हणून पावसाळा आहे तुम्हीही सावधानता बाळगा. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: Viral videos

    पुढील बातम्या