Home /News /news /

शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, माजी मंत्र्याला पुन्हा खास जबाबदारी!

शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी, माजी मंत्र्याला पुन्हा खास जबाबदारी!

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीतील सर्व आमदार आणि खासदार यांच्यात समन्वय..

मुंबई, 10 ऑगस्ट : राज्यापुढे असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीशी ठाकरे सरकार दोन हात करत आहे. तर दुसरीकडे भाजप सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. काही महिन्यांपूर्वी शिवसेना आमदार आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली होती. पण, आता वायकरांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मंत्री रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या आधीही रवींद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तशी अधिसूचनाही काढण्यात आली होती. मात्र, नंतर विरोधकांनी तांत्रिक मुद्दा उपस्थित केल्यामुळे  ही नेमणूक रद्द करण्यात आली होती. मोठी बातमी, राष्ट्रवादीचे 12आमदार भाजपच्या गळाला? NCPच्या मोठ्या नेत्याचा खुलासा आता सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा एकदा रवींद्र वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर बसवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. महाविकास आघाडीतील सर्व आमदार आणि खासदार यांच्यात समन्वय रहावा तसंच त्यांच्या मतदारसंघातील प्रश्नं सोडवण्यासाठी रविंद्र वायकर हे सन्वयक असतील, असं रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या व्हिडिओ कान्फर्सिंग बैठकीत सांगितल्याचं समजतंय.' काय आहे प्रकरण? शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची 11 फेब्रुवारीला मुख्यमंत्री कार्यालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर 14 फेब्रुवारीला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. राज्य शासनाने अधिकृत अध्यादेश काढून ही नियुक्ती करण्यात आली होती. या अध्यादेशात वायकर आणि सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख आता वादाचे कारण बनले होते. IPL 2020 च्या स्पॉन्सरशिप शर्यतीत आता बाबा रामदेव! पतंजली लावणार बोली कारण, हे सरकारी लाभांचे पद आहेत. ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमानुसार, विरोधी पक्ष भाजपाकडून यावर कडाडून आक्षेप घेण्यात आला होता. एवढंच नाहीतर भाजप  कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली होती. त्यामुळे  शिवसेनेने सावध पवित्रा घेत वायकर आणि सावंत यांना पदभार स्वीकारण्यास रेड सिग्नल दिला होता.  अजून संबंधित पदाचा भार स्वीकारलेला नाही.  सावध उपाययोजना म्हणून शिवसेनेनं दोघांकडून राजीनामेही घेतले होते.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ravindra waikar, Shivsena, उद्धव ठाकरे, रवींद्र वायकर, शिवसेना

पुढील बातम्या