पोटदुखीसाठी गेल्या डॉक्टरांकडे आणि नंतर कळलं किडनीच झाली 'चोरी'

तुमचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी डॉक्टरांनी तुमची किडनीच काढली असं सत्य जर तुम्हाला समजलं तर यावर तुमच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही.

News18 Lokmat | Updated On: Dec 21, 2018 04:23 PM IST

पोटदुखीसाठी गेल्या डॉक्टरांकडे आणि नंतर कळलं किडनीच झाली 'चोरी'

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 21 डिसेंबर : तुमचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी डॉक्टरांनी तुमची किडनीच काढली असं सत्य जर तुम्हाला समजलं तर यावर तुमच्या पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही. असाच काहीसा प्रकार सोलापुरात घडला आहे.

नागरिकांनो, गोर-गरिब रुग्णांची फसवणूक आणि पिळवणूक आता नवीन राहिली नाही. मात्र देवदूत समजले जाणारे डॉक्टरही अनेकदा खिसेकापूंची भूमिका बजावतात आणि मग समोर उभं राहतं एक धक्कादायक आणि सुन्न करणारं वास्तव. सोलापुरातही असंच काहीसं घडल्याचा आरोप होतोय.

2016मध्ये पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानं आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या सुनीता इमडे या सोलापुरातील नावाजलेल्या अश्विनी रुग्णालयात अॅडमिट झाल्या. आजार मोठा आहे असं म्हणत डॉक्टरांनी ऑपरेशन तर केलं मात्र सुनीतांचं अख्खं आयुष्यचं आता अधू झालंय.

सुनीता या एकट्या त्याचं घर चालवता. त्यांच्यावर त्यांच्या मुलाचीही जबाबदारी आहे. अशात त्यांनी स्वखर्चाने ऑपरेशन केलं. पण डॉक्टरांनी काय केलं तर थेट त्यांची उजव्या बाजूची किडनी काढून विकली.

Loading...

ऑपरेशननंतर वारंवार अस्वस्थ वाटू लागल्यानं सुनीता एका रिचर्स फाऊंडेशनकडे गेल्या आणि त्यानंतर त्यांची उजवी किडनी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. तर सुनीता यांना झालेल्या आजारात किडनी काढण्याचा काहीही संबंध नसल्याचं डॉ. महेश नायकुडे (अध्यक्ष - सनराईज हेल्थ अँड रिसर्च फाऊंडेशन) यांनी म्हटलं आहे.

हे प्रकरण गंभीर आहे. सुनीता सारखे अनेक रुग्ण या रॅकटचा बळी पडले असतील. याची गांभीर्यता लक्षात घेता सनराईस हेल्थ अँड रिचर्स फाऊंडेशननं थेट पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे दाद मागितली. त्यावर चौकशी आदेश देण्यात आल्याचं डॉ. महेश यांनी सांगितलं.

मात्र गरज नसताना किडनी काढून घेतल्याच्या आरोपामुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या अश्विनी रुग्णालयानं कानावर हात ठेवलेत. याबद्दल त्यांना काहीही माहित नसल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. पण या सगळ्यावर लवकर कारवाई होणं आवश्यक आहे.


Special Report: कमलनाथांच्या वक्तव्याने काँग्रेसची गोची, मनसेचा 'मौके पें चौका'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 21, 2018 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...