सोलापुरात टोल नाक्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हाती लागलं मोठं घबाड

सोलापुरात टोल नाक्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या हाती लागलं मोठं घबाड

कारमध्ये चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटखाली खास लॉकर तयार करण्यात आला होता.

  • Share this:

सोलापूर, 14 डिसेंबर: सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अधिकाऱ्यांनी सावळेश्वर टोल नाक्याजवळ एका गाडीतून सुमारे 6 किलो सोनं जप्त केलं आहे. रविवारी रात्री उशीरा झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपींकडून सोन्याचे 6 मोठे, 2 मध्यम तर 3 लहान बिस्कीटे जप्त केली आहेत. सर्व सोन्याचं वजन 6 किलो 339.81 ग्रॅम आहे. (अंदाजे किंमत 3 कोटी 16 लाख 35 हजार 649 रुपये) त्याचबरोबर एक ह्युंदाई कार देखील ताब्यात घेतली आहे.

हेही वाचा......मग शाळेत कसा होईल कोरोना? विद्यार्थ्यांच्या प्रश्नानं आयुक्तही चक्रावले

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेली माहिती अशी की, सोन्याची तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनिय माहिती खबऱ्याकडून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर टोल नाक्याजवळ पोलिसांनी सापळा रचल. एक कार (क्र. WB 02 AP 1596) टोल नाक्यावर आली असता पोलिसांनी अडवली. कारमध्ये बसलेल्या दोघांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, ते काहीच सांगायला तयार नव्हते. मात्र त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटासारखे बोलू लागलं. कारची तपासणी केली असता त्यात तब्बल 6 किलो सोनं आढळून आलं. आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टनम येथून मुंबईकडे हे सोने नेलं जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

चालकाच्या सीटखाली खास लॉकर...

कारमध्ये चालक आणि त्याच्या बाजूच्या सीटखाली खास लॉकर तयार करण्यात आला होता. या लॉकरमध्ये सोनं लपवून ते मुंबईला नेण्यात येत होतं. मुंबईला नेमकं हे सोनं कोणी मागवलं होतं, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

हेही वाचा... राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा पोलीस ठाण्यात ढसाढसा रडल्या

आरोपींकडून सोनं, कार आणि दोन मोबाईल असा एकूण 3 कोटी 26 लाख 49 हजार 649 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.

Published by: Sandip Parolekar
First published: December 14, 2020, 8:09 PM IST

ताज्या बातम्या