BIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या?

कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्या प्रकरणी संशयित के टी नवीनकुमारला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 24, 2018 04:57 PM IST

BIG BREAKING :हिंदुत्ववाद्यांकडे 16 पिस्तुल्स होत्या तयार,दोन वापरल्या?

बंगळुरू, 24 आॅगस्ट : गौरी लंकेश हत्येप्रकरणी संशयित के.टी. नवीनकुमारच्या चौकशीत धक्कादायक माहितीसमोर आली आहे. एकूण 16 पिस्तुल तयार होत्या. त्यापैकी 2 पिस्तुल वापरण्यात आल्या अशी धक्कादायक माहिती नवीन कुमारने दिलीये. नेमक्या किती हत्या करण्याचा कट होता याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही. कर्नाटक एसआयटीच्या तपासातही माहिती उघड झालीये.

कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश हत्या प्रकरणी संशयित के टी नवीनकुमारला ताब्यात घेतलंय. त्याची चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्याने त्याने  16 पैकी 2 पिस्तुलांचा वापर झाल्याची माहिती दिली. तसंच याआधी अमोल काळेच्या डायरीत 34 जणांची नावं उघड झाली होती. नवीन कुमारने श्रीकांत पांगारकर आणि अमोल काळेची भेट झाल्याचं कबूल केलंय. नोव्हेंबर 2017 मध्ये मद्दूरमध्ये या तिघांची भेट झाली होती. या भेटीवेळी अमोलने अनिलकुमारला 2 पिस्तुल्स दाखवल्या होत्या अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली.

तसंच कर्नाटक एसआयटीने ओळख परेडही केली. यात  श्रीरंगपटनच्या युवकाने अमोल काळेला ओळखलंय. मात्रसंशयितांच्या ओळख परेड बाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे.

दरम्यान, कर्नाटक शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यानेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना प्रशिक्षण दिल्याचं समोर आलं आहे. राजेश बनगेराकडून गौरी लंकेश आणि दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आल्याचं कर्नाटक एसआयडीच्या चौकशीत समोर आलं आहे. 23 जुलै रोजी अटक करण्यात आलेल्या 50 वर्षीय राजेश बनगेरा याच्यावर तरुणांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. राजेश बनगेरानेच सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना प्रशिक्षण दिल्याचं एसआयटीच्या चौकशीतून सांगण्यात आलं आहे. बनगेरा हा सध्या कर्नाटक एसआयटीच्या ताब्यात आहे. त्याने तब्बल 50 जणांना पिस्तुल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं असल्याची माहिती एसआयटीने दिली आहे.

---------------------------------------

Loading...

बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 24, 2018 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...