मुंबई, १० जुलै : कलर्स मराठीवरच्या बिग बाॅसमध्ये आज तुम्ही आहात चक्क बीबी हाॅटेलात. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचं बीबी हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती मॅनेजर असणार आहे. बीबी मध्ये हाॅटेलमध्ये अतिथी म्हणून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच वीणा जगताप येणार आहेत. आणि घरातील सदस्यांना त्यांची सेवा करायची आहे.
त्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे देखील येणार आहेत. यांचे मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून हाॅटेलमध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार ? कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार ? असं बरंच काही आजच्या भागात आहे.
हेही वाचा
मुंबईकरांना जेट एअरवेजने दिली 'ही' सूट
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले पैसा फेक तमाशा देख हे नॉमिनेशन कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारे हे कार्य होते. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झालत.