नवी दिल्ली, 19 जून : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सध्या सुरू असलेली 5 सामन्यांची टी-20 मालिका अशा स्थितीत आहे, जिथे एक चूक कोणत्याही संघाला महागात पडू शकते आणि मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहू शकते. त्यामुळे अंतिम सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ सर्वतोपरी प्रयत्न करतील. शेवटच्या 2 सामन्यांमध्ये टीम इंडियाने आफ्रिकेवर पलटवार करत ज्या प्रकारे विजय मिळवला, त्यामुळे भारतीय संघाचे इरादे आणि विजयाच्या आशा दोन्हीही उंचावल्या आहेत. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या विजयात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी पण, भुवनेश्वर कुमार टीम इंडियासाठी 'ब्रह्मास्त्र' ठरला.
पहिला सामना सोडता भुवनेश्वरने संपूर्ण मालिकेत शानदार गोलंदाजी केली. विशेषत: पॉवरप्लेमध्ये त्याने आफ्रिकेच्या फलंदाजांना अक्षरश: जखडून ठेवले. भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मालिका घरच्या मैदानावर जिंकायची असेल, तर भुवनेश्वरला शेवटच्या टी-20 मध्ये आपली छाप सोडावी लागेल. या मालिकेतील त्याची विक्रमी कामगिरी टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढवणारी आहे.
भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत मालिकेतील 4 टी-20 सामन्यांमध्ये 14.16 च्या सरासरीने 6 विकेट घेतल्या आहेत आणि अतिशय किफायतशीर गोलंदाजीही केली आहे. त्याने 6.07 च्या इकॉनॉमीवर धावा दिल्या आहेत. या मालिकेत त्याने 4 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. फक्त हर्षल पटेलने त्याच्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. पटेलने 4 सामन्यात 12.57 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत.
हे वाचा - भाऊच झाला भावाचा वैरी! इंटरनॅशनल मॅचमध्ये भावानेच केलं जेसन रॉयला बोल्ड, Video
भुवनेश्वरने पॉवरप्लेमध्ये 4 बळी घेतले -
संपूर्ण मालिकेत भुवनेश्वर प्रभावी ठरल्याचे या कामगिरीवरून दिसून येत आहे. पण, पॉवरप्लेच्या पहिल्या 6 षटकांमध्ये त्याची गोलंदाजी अतुलनीय ठरली आहे. याच काळात त्याने आफ्रिकन संघाचे सर्वाधिक नुकसान केले आहे. पॉवरप्लेमध्ये त्याने आतापर्यंत 54 चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये त्याने केवळ 32 धावा दिल्या आहेत आणि 4 विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. पॉवरप्लेमध्ये त्याचा इकॉनॉमी रेट 3.55 आहे. म्हणजेच भुवीने सर्वाधिक विकेट्स पॉवरप्लेमध्ये घेत आफ्रिकन फलंदाजांना धावाही काढून दिलेल्या नाहीत. तो टीम इंडियासाठी 'ब्रह्मास्त्र' ठरला आहे. त्याचे वार कधीही चुकत नाहीत.
हे वाचा - भारतीय क्रिकेटपटूने ठोकलं लागोपाठ दुसरं शतक, मैदानात पत्नीसाठी झळकावलं लव्ह लेटर
भुवनेश्वर इतिहास रचण्यापासून 1 विकेट दूर
भुवनेश्वर आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या विश्वविक्रमापासून एक विकेट दूर आहे. बंगळुरूमध्ये पहिल्या 6 षटकांत त्याने आणखी 1 बळी घेतल्यास तो पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनेल. सध्या तो या बाबतीत वेस्ट इंडिजच्या सॅम्युअल बद्री आणि न्यूझीलंडच्या टीम साऊदीच्या बरोबरीत आहे. तिघांनीही पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत 33 विकेट घेतल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Cricket news, T20 cricket