पटियाला, 23 जानेवारी: स्वातंत्र्यपूर्व काळात देशात अनेक श्रीमंत राजघराणी होती. त्यात पटियाला राजघराणं सर्वात मोठं होतं. महाराजा भूपिंदर सिंह देशातील महिले असे राजा होते ज्यांच्याजवळ आपलं स्वत:चं विमान होतं. त्यांची लाइफस्टाइल अशी होती की इंग्रजही त्यांच्या स्टाइलकडे पाहून जळत होते. भूपिंदर सिंह जेव्हा परदेशात जात होते. तेव्हा ते संपूर्ण हॉटेलच भाड्यानं घेत होते. त्यांच्याजवळ तब्बल 44 रोल्स रॉइस गाड्या होत्या. तर जेव्हा राजाचा काफिला निघत होता तेव्हा त्यांच्यासोबत तब्बल 22 रोल्स रॉयल गाड्या जात होत्या.
महाराजा भूपिंदरसिंह यांचे अनेक किस्से
महाराजा भूपिंदर पटियाला घरण्याचे राजा होते. त्यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती असल्याची माहिती आहे. येवढच नाही तर त्यांच्याविषयी अनेक किस्से सांगितले जातात. ते भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार होते. जेव्हा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची स्थापना झाली तेव्हा महाराजांनी खुप पैसे दिले असल्याचं सांगितलं जातं. येवढचं नाही तर जेव्हा भारतीय क्रिकेट संघ परदेशात खेळण्यासाठी जात होता तेव्हा त्यांचा संपूर्ण खर्च महाराजा भूपिंदरसिंह करत होते. 1940 पर्यंत भारतीय संघाचा संपूर्ण खर्च महाराजा उचलत होते. त्या बदल्यात त्यांना भारतीय संघाचा कर्णधार बनवलं जातं होतं.
पहिलं खासगी विमान असणारी व्यक्ती
महाराजा भूपिंदरसिंह ही देशातील पहिली व्यक्ती होती ज्यांच्याजवळ स्वत:चं विमान होतं. महाराजांनी विमान 1910 साली ब्रिटनकडून विकत घेतल्याची माहिती मिळते. विमानाची देखभाल करण्यासाठी महाराजांकडे पूर्ण स्टाफ होता. विमान उतरवण्यासाठी पटियालातच धावपट्टी तयार करण्यात आली होती. विमानातून अनेकदा परदेश दौराही महाराज करत असल्याची माहिती आहे.
भूपिंदरसिंह यांच्यावर अनेक पुस्तकं
महाराजा भूपिंदरसिंह यांच्या जीवनावर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहे. दीवान जर्मनी दास यांनी त्यांच्या जीवनावर 'महाराजा' नावाचं पुस्तक लिहलं आहे. या पुस्तकातून महाराजा किती अलिशान जीवन जगत होते यांची माहिती त्यांनी लिहिली आहे. तर लेपियर कोलिंग यांच्या 'फ्रीडम ऍट मिडनाईट' मध्ये महाराजांची ऐशआरामी जीवनशैली सांगण्यात आली आहे.
10 वेळा लग्न, 300 राण्या आणि 88 मुलं
महाराजा भूपिंदरसिंह यांनी दहा वेळा लग्न केलं असल्याची माहिती आहे. या शिवाय त्यांच्या हरममध्ये 300 पेक्षाअधिक राण्या असल्याची माहिती आहे. परदेशी महिलाही त्यांच्या राण्या होत्या. महाराजांना त्यांच्यापासून 88 मुलं होती.
परदेशातही मोठा थाट
महाराजा भूपिंदरसिंह यांचा देशात नाही तर परदेशातही मोठा थाट होता. परदेश दौऱ्यावर जाताना मोठा लवाजमा त्यांच्यासोबत जात होता. लंडन आणि पॅरिसमधील महागड्या हॉटेलमधील संपूर्ण मजलाच ते भाड्यानं घेत होते. त्यांचं अलिशान राहाण पाहून परदेशातील लोकंही आवाक होत होते.
हिटलरनं दिली होती कार भेट
भूपिंदरसिंह यांच्या गाड्यांच्या ताफ्यात 44 रोल्स रॉइस होत्या. त्यांची गाड्यांची आवड पाहून हिटलरनंही त्यांना एक कार बक्षिस म्हणून दिली होती. 1935 साली बर्लिन दौऱ्यावर असताना त्यांची भेट हिटरशी झाली. महाराजांना भेटून हिटलर येवढे प्रभावित झाले की त्यांनी आपली कार महाराजाला बक्षीस म्हणून दिली. हिटलरसोबत महाराजांची मैत्री फार वेळ टिकली.
सर्वात महागड्या हिऱ्यांचा हार
महाराजा भूपिंदरसिंह यांनी 1929 साली मौल्यवान नग, हिरे आणि आभूषणं असलेली एक पेटी पॅरीसमधील ज्वेलर्सला पाठवली होती. त्यानंतर तर महाराजाच्या श्रीमंतीची चर्चा संपूर्ण पॅरिसमध्ये पसरली होती. मौल्यवान दागिन्यांपासून हार तयार करण्यासाठी कारागिरांना तब्बल 3 वर्षं लागली. त्या वेळी त्या हाराची किंमत तब्बल 250 लक्ष डॉलर होती. हा हार देशातील सर्वात महागडा हार होता.
महाराजाची स्वत:ची क्रिकेट टीम होती
महाराजा भूपिंदरसिंह यांनी भारतीय क्रिकेटच्या उभारणीत मोठा आर्थिक हातभार लावला होता. त्यानंतरही बोर्डाला महाराज मदत करत होते. मुंबईतील ब्रेबोर्स स्टेडियमचा एक हिस्सा त्यांनी दिलेल्या आर्थिक मदतीतून तयार झाला होता. भारतीय क्रिकेट संघ आणि मेलबर्न क्रिकेट संघाकडूनही ते खेळले आहे. त्यांनी सर्वप्रथम ब्रिटिश क्रिकेट कोचला भारतात बोलावलं. त्यांनी स्वत:ची क्रिकेट टीम तयार केली होती. त्यांच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू होते. लाला अमरनाथही त्यांच्या क्रिकेट टीममध्ये होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bhupinder singh, Patiala S19p13