छत्तीसगड : भूपेश बघेल यांच्या जागी हा 500 कोटींचा मालक झाला असता मुख्यमंत्री पण...

अंबिकापूरमध्ये सिंहदेव यांची ताकद इतकी मोठी आहे की 2008 पासून सलग आतापर्यंत ते अंबिकापूरमधून निवडून आले. पण छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मात्र अखेर भूपेश बघेल यांनी बाजी मारली.

  • Share this:

विधानसभा निवडणुकांत छत्तीसगडमध्ये काँग्रेसला भरघोस यश मिळालं आहे. या यशानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदावर विराजमान कोण होणार याची चर्चा झाली. यात आघाडीचं नाव होतं टीएस सिंहदेव यांचं.

डॉ. रमण सिंह यांच्यानंतर आता टीएस सिंहदेव हे छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपद भूषवणार असं जवळपास निश्चित झालं होतं. सिंहदेव हे छत्तीसगड विधानसभेत विरोधी पक्षनेते होते.

टीएस सिंहदेव हे अंबिकापूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अंबिकापूरमध्ये सिंहदेव यांची ताकद इतकी मोठी आहे की 2008 पासून सलग ते निवडून आले.

2013 विधानसभा निवडणुकांमध्येदेखील ते सगळ्यात श्रीमंत उमेदवार होते. टीएस सिंहदेव यांच्याकडे तब्बल 500 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.

छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातल्या शाही कुटुंबातून आलेले सिंहदेव यांचं पक्षाच्या जाहीरनाम्यात सगळ्यात जास्त योगदान होते.

सिंहदेव यांनी 'जाहीरनामा पत्र' असं अभियान सुरू केलं होतं. लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या मागण्या त्यांनी जाहीरनाम्यात लिहल्या होत्या. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी आखलेल्या योजनांमुळे आज काँग्रेसला दणदणीत विजय मिळाला असल्यांचं पक्षातल्या नेत्यांचं म्हणणं आहे. याचं सगळं श्रेय हे सिंहदेव यांना जातं.

सिंहदेव यांचं पक्षात मानाचं स्थान आहे. त्यांना सगळे जण टीएस बाबा नावाने ओळखतात. 31 ऑक्टोबर 1952 ला इलाहाबादमध्ये जन्माला आलेले सिंहदेव हे अविभाजित मध्यप्रदेशचे माजी मुख्य सचिव होते.

सिंहदेव हे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. राजकारणात इतका मोठा ठसा उमटवणाऱ्या सिंहदेव यांनी खरंतर अनेक वर्ष स्वत:ला राजकारणापासून दूर ठेवलं होतं. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच 1983मध्ये त्यांची अविभाजित मध्यप्रदेश राज्याचे काँग्रेस कमिटी सदस्य म्हणून निवड झाली.

काँग्रेसमधली एकी जपून ठेवण्यामध्ये सिंहदेव यांची महत्त्वाची भूमिका आहे. सरळ स्वभावामुळे ते सगळ्यांचे लाडके नेते होते. त्यामुळेच ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू नेते होते.

छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मात्र अखेर टीएस बाबा अर्थात टी एस सिंहदेव यांच्या ऐवजी भूपेश बघेल यांनी बाजी मारली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2018 03:44 PM IST

ताज्या बातम्या