S M L

वाराणसी पूल दुर्घटना : मृतदेह देण्यासाठी मागितली 200 रुपयांची लाच

पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

Sachin Salve | Updated On: May 16, 2018 10:48 PM IST

वाराणसी पूल दुर्घटना : मृतदेह देण्यासाठी मागितली 200 रुपयांची लाच

16 मे : वाराणसी पूल दुर्घटनेतल्या मृतदेह नातलगांना देण्यासाठी 200 रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या घटनेतले मृतदेह सुंदरलाल रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. हे मृतदेह शवागारातून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्याने प्रत्येकी २०० रुपये घेतल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. ही बातमी पसरताच संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांनी मृतदेह काढण्यासाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हा आरोप केला आहे. तसंच जेव्हा कर्मचारी पैसे मागत होते तेव्हा एक दोघांनी त्यांचे ते वर्तन मोबाईलच्या कॅमेरातही कैद केलं आहे. या व्हिडिओत कर्मचारी मृतदेह ताब्यात देण्यासाठी २०० रुपये मागताना स्पष्टपणे दिसत आहेत. काल वाराणसी येथील पुलाचा काही भाग कोसळून १८ जण ठार झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 10:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close