तृतीयपंथीयांसाठी देशातलं पहिलं शौचालय भोपाळमध्ये !

तृतीयपंथीयांसाठी देशातलं पहिलं शौचालय भोपाळमध्ये !

तृतीयपंथीयांसाठीचं देशातलं पहिलं शौचालय आज भोपाळमध्ये बांधण्यात आलंय. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते यांनी लालफित कापून या वास्तुचं अनावरण केलं. मध्य प्रदेशातल्या स्वच्छ भारत अभियानात तृतीय पंथीयांना सहभागी करून घेणार असल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तृतीयपंथीच्या संख्येत भोपाळचा क्रमांक देशात पहिला लागतो.

  • Share this:

भोपाळ, 2 ऑक्टोबर : तृतीयपंथीयांसाठीचं देशातलं पहिलं शौचालय आज भोपाळमध्ये बांधण्यात आलंय. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याहस्ते यांनी लालफित कापून या वास्तुचं अनावरण केलं. मध्य प्रदेशातल्या स्वच्छ भारत अभियानात तृतीय पंथीयांना सहभागी करून घेणार असल्याचं शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. तृतीयपंथीच्या संख्येत भोपाळचा क्रमांक देशात पहिला लागतो.

तृतीय पंथीयांना सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे शौचालय कारण त्यांच्यासाठी आजवर कुठंच स्वतंत्रपणे शौचालंय बांधलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी शौचालयास नेमकं कुठे जायचं हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. कारण स्त्रियांच्या शौचालयात तृतीयपंथीयांना प्रवेश नाकारला जातो, पुरूषांच्या शौचालयात तर तृतीयपंथीयांनी जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण तृतीयपंथी स्वतःली स्त्री समजतात. उघड्यावर बसलं तर तिथंही बघे मंडळींकडून त्रास दिला जातो. तृतीयपंथीयांची हीच अडचण लक्षात घेऊन मध्यप्रदेश सरकारने त्यांच्यासाठी स्वतंत्र शौचालयं उभारण्याचा निर्णय घेतलाय.

देशभरात अंदाजे 5 लाख तृतीयपंथी आहेत त्यापैकी एकट्या भोपाळ शहरात 30 हजाराच्यावर तृतीयपंथी आहेत. म्हणूनच मध्यंतरी तिथली एक तृतीयपंथी निवडणुकीत देखील उतरला होता आणि निवडूनही आला होता. मध्यप्रदेशच्या देवास आणि सागर जिल्ह्यातही तृतीयपंथीयांची संख्या बऱ्यापैकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2017 11:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...