Home /News /news /

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतीत उपस्थित पत्रकार होता कोरोना पॉझिटिव्ह, सगळेच होणार क्वारंटाईन

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतीत उपस्थित पत्रकार होता कोरोना पॉझिटिव्ह, सगळेच होणार क्वारंटाईन

जे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या सर्व पत्रकारांची तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

    मध्य प्रदेश, 25 मार्च : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकारांची चाचणी केली जाणार आहे. कारण भोपाळमधील कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकाराची मुलगी कोरोना सकारात्मक आढळली आहे. यामुळे संपर्कात येणाऱ्या सर्व पत्रकारांना क्वारंटाईनला जावे लागेल असा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पत्रकार परिषदेत हजर असलेल्या नेत्यांची यादी प्रशासनाकडूनही घेतली जात आहे, जे पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या सर्व पत्रकारांची तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फक्त भोपाळच नाही तर दिल्लीतील पत्रकारदेमध्ये सुद्धा हा पत्रकार उपस्थित असल्याचं सांगण्यात येत आहे. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी भोपाळ इथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत भोपाळच नव्हे तर दिल्लीतील पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे या सगळ्या पत्रकारांच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादूर्भाव वेगान वाढताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 510 हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवणं आणि घरातून बाहेर न पडण्याचे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत. या आदेशाचं पालन राज्य सरकारनं आपल्या राज्यात योग्य पद्घतीनं अंमलात आणण्याचे निर्देश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊन घोषणेनंतर तेलंगणा सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता तेलंगणातील नागरिकांनी घराबाहेर पडल्यास दिसताच क्षणी गोळी घालण्याचे आदेश देऊ असा इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. लॉकडाऊन दरम्यान कुणी घराच्या बाहेर पडल्यास गोळ्या घालण्याचे आदेश देऊ, असा कठोर इशारा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू आहे.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या