Home /News /news /

भोपाळमध्ये 'जनता फ्रीज' योजना, गरजवंतासाठी ठरतंय उपयुक्त; काय आहे ही नेमकी योजना?

भोपाळमध्ये 'जनता फ्रीज' योजना, गरजवंतासाठी ठरतंय उपयुक्त; काय आहे ही नेमकी योजना?

तमिळनाडूतील कम्युनिटी फ्रीज (Tamilnadu Community Fridge) या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भोपाळमध्येही जनता फ्रीज ही योजना सुरू करण्यात आली आहे.

भोपाळ, 30 ऑक्टोबर: कोरोना काळ संपत आल्याची चिन्ह आता दिसत आहेत. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोना काळात स्वयंसेवी संस्था, समाजातील दानशूर व्यक्तींना सढळ हाताने मदत केली. गरीबांना कपडे, अन्न अशी सगळ्या प्रकारची मदत समाजाने केली. आता त्यापैकी काही उपक्रम पुढे चालवले जात आहेत. तमिळनाडूतील कम्युनिटी फ्रीज (Tamilnadu Community Fridge) या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन भोपाळमध्येही जनता फ्रीज ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचं वृत्त दैनिक भास्करने दिलं आहे. भोपाळमध्ये या आधी ‘नेकी की दीवार’ (Neki Ki Deewar) म्हणजे सत्कर्माची भिंत हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. यामध्ये एका भिंतीवर ज्यांना दान करायचे त्या व्यक्ती कपडे लटकवून निघून जातात. त्यानंतर ज्याच्या-त्याच्या गरजेनुसार गरजू व्यक्ती कपडे घेऊन जातात. तशीच पद्धतीने सध्या जनता फ्रीज ही योजना आहे. या फ्रीजमध्ये दानशूर खाद्यपदार्थ ठेवून जातात आणि गरजवंत हवा तो पदार्थ घेऊन जातात. या फ्रीजमध्ये सुमारे 100 जणांना पुरेल इतकं अन्न ठेवता येऊ शकतं. या फ्रीजजवळच एक काउंटर (Counter) आहे तिथं दानशूर व्यक्ती धान्य, कपडे, उबदार कपडे, कांबळी, औषधं ठेऊन जातात. या वस्तू गरजवंत घेऊन जातात. भंते शाक्यपुत्र सागर यांनी दोन दिवसांपूर्वी या भागातील बुद्ध विहारात बुद्ध वंदना केली आणि त्यानंतर जनता फ्रीजचं लोकार्पण करण्यात आलं. शुक्रवारी स्वयंसेवी संघटना तसंच पेन्शनरांना या उपक्रमाला मदत केली. हेही वाचा-  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोप फ्रान्सिस यांच्यात तासभर चर्चा, मोदींकडून भारतात येण्याचं निमंत्रण
 ललिताराम जनविकास कल्याण समिती भोपाळचे प्रदेश अध्यक्ष वीरेंद्र मिश्रा यांनी मित्रांसोबत गरजूंना दूध-बिस्किटं वाटली. मिश्रा म्हणाले, ‘हा उपक्रम गरजूंसाठी फायद्याचा आहे. आमची संस्था दररोज इथे मदत देईल.’
भंते सागर थेरो म्हणाले, ‘ अनेक संस्था, व्यक्ती समाजकार्यासाठी पुढाकार घेत असतात. लॉकडाउनमध्ये बुद्ध विहारच्या (Buddha Vihar) माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी गरजूंना भोजन वितरित केलं होतं तेव्हाच मनात विचार आला होता की कोरोना काळानंतरही गरजूंना पोट भरण्यासाठी अन्न लागणारच आहे. तमिळनाडूती कम्युनिटी फ्रीजची बातमी वृत्तपत्रात वाचली होती. मग तमिळनाडूच्या धर्तीवर जनता फ्रीज उपक्रम सुरू करण्याचं ठरवंल. दात्यांच्या मदतीने एक मोठा फ्रीज तयार करून घेतला. तो तयार करायला एक लाख रुपये खर्च आला.’ हेही वाचा-  कोरोना नाही तर, डेंग्यूच्या रुग्णामध्ये आढळलं Black Fungus; इंदौरमध्ये सापडले दोन रुग्ण
 ते पुढे म्हणाले, ‘हजारो माणंस जिथून ये-जा करतात अशा ठिकाणी हा जनता फ्रीज ठेवला आहे. त्यामुळे कुणालाही त्यात पदार्थ ठेवणं आणि काढणं सहज शक्य होतं. तिथं कुणा कर्मचाऱ्याला ठेवलेलं नाही. सीसीटीव्ही मात्र लावला आहे.’
असे अनेक उपक्रम सध्या समाजात चालवले जातात. त्यांचा फायदाही अनेक गरजू घेतात.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Bhopal News

पुढील बातम्या