'मित्राला समजवा, त्याच्यामुळे तुम्हाला शिव्या पडतात'

'मित्राला समजवा, त्याच्यामुळे तुम्हाला शिव्या पडतात'

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सिद्धू यांना सल्ला दिला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: पुलवामा हल्ल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावर सर्वांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळे त्यांना 'द कपील शर्मा शो' मधून काढून टाकण्यात आले. त्यावरुन पंजाब विधानसभेत देखील काल (सोमवारी) गदारोळ झाला होता. आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी सिद्धू यांना सल्ला दिला आहे. दिग्विजय सिंग यांनी twitterवरुन सिद्धूंना सांगितले आहे की, नवज्योत सिंग सिद्धू तुमच्या मित्राला (पाक पंतप्रधान इमरान खान) समजवा. त्याच्यामुळे तुम्हाला शिव्या पडतात आहेत.

VIDEO : आमच्यावर आक्रमण करण्याचा भारतानं विचारही करू नये - इम्रान खान

दिग्विजय सिंह यांनी एकापाठोपाठ एक Tweets करत केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी मोदी सरकारला आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. काश्मीर प्रश्न सोडवला नाही तर सर्वजण आपल्यालाच दोषी ठरवतील. काही काळासाठी राजकीय मतभेद विसरुन जम्मू-काश्मीरमधील मुस्लीम आणि हिंदूंना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील काँग्रेस, भाजप, पीडीपी आणि अन्य राजकीय पक्षांनी पुढील 10 वर्षासाठीचा एक रोड मॅप तयार करण्याची गरज आहे. त्यानंतर सिंह यांनी सिद्धू यांना सल्ला दिला आहे.

पुलवामामध्ये 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर सिद्धूने या हल्ल्यासाठी संपूर्ण देशाला दोषी ठरवता येणार नाही, असे म्हटले होते. यासाठी देशाला किंवा एका व्यक्तीला दोष देता येणार नाही. सिद्धूंच्या या विधानानंतर सोशल मीडियावरुन जोरदार टीका झाली होती. या टीकेची दखल घेत सोनी टिव्हीने द कपील शर्मा शोमधून त्याची हकालपट्टी केली होती. पंजाब विधानसभेत देखील अकाली दलाने सिद्धूंच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्याची मागणी केली होती.


काश्मीरमध्ये जो शस्त्र हातात घेईल त्याचा खात्मा करु- भारतीय लष्कर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 04:23 PM IST

ताज्या बातम्या