Video: मंदिरात होत आहेत बलात्कार; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!

Video: मंदिरात होत आहेत बलात्कार; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ!

हिंदुत्वावरून पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे.

  • Share this:

भोपाळ, 17 सप्टेंबर: हिंदुत्वावरून पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केला आहे. मंगळवारी भोपाळमधील संत समागम येथे बोलताना त्यांनी संपूर्ण देशातील मठांचे आणि मंदिरांचा राजकीय अड्डा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. एवढ बोलून सिंग गप्प बसले नाहीत. ते म्हणाले, मंदिरात बलात्कार होत आहेत आणि अशा प्रकारची कृत्य करणारे लोक भगवे कपडे घालतात.

राजधानी भोपाळमधील संत समागम येथे बोलताना सिंग म्हणाले, सनातन धर्म बदनाम करणाऱ्याना ईश्वर कधीच माफ करणार नाही. गेल्या काही दिवसांपासून मठ आणि मंदिरांचे राजकीय अड्डे करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशासाठी हा मोठा धोका असल्याचे ते म्हणाले. कोणाचेही नाव न घेता त्यांनी साधू आणि संतांवर देखील गंभीर आरोप केले. साधू आणि संतांच्या वेशात मंदिरात बलात्कार होत आहेत. आज भगवे कपडे घालून औषध विकण्याचे काम केले जात आहे. सनातन धर्म बदनाम करणाऱ्यांवर यावेळी सिंग यांनी जोरदार हल्ला चढवला.

जय श्रीराम नको तर...

संतांच्या संम्मेलनात भाजपच्या जय श्रीराम ही घोषणा करण्यात आली होती. यावर सिंग यांनी जय श्रीराम ऐवजी जय सियाराम अशी घोषणा देण्याचा सल्ला सिंग यांनी संतांना दिला. यावेळी सिंग यांना राज्यातील कमलनाथ सरकारच्या कामांचे कौतुक देखील केले. गेल्या सरकारने आनंद विभाग तयार केला होता. पण आताच्या सरकारने धर्मस्व आणि आध्यात्म विभाग तयार केले आहेत. मध्य प्रदेशमध्ये इतक्या संस्कृत शाळा आहेत त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचे आणि त्यांचे व्यवस्थापन सरकारने स्वत:च्या ताब्यात घ्यावे असेही ते म्हणाले.

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

Published by: Akshay Shitole
First published: September 17, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading