Home /News /news /

चोरट्यांनी मारला सव्वा कोटींच्या मौल्यवान धातूवर डल्ला, पण.. अवघ्या 12 तासांत झाली अटक

चोरट्यांनी मारला सव्वा कोटींच्या मौल्यवान धातूवर डल्ला, पण.. अवघ्या 12 तासांत झाली अटक

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 12 तासांत पोलिसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या

भिवंडी, 13 नोव्हेंबर: नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वळगाव येथील गोदमातून चोरीस गेलेल्या 1 कोटी, 35 लाख, 1 हजार 912 रुपये किमतीचा 12.3 टन वजनाचा मौल्यवान धातूवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. पण, घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांत पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून मौल्यवान धातूचा मुद्देमालही ताब्यात घेतला आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस स्टेशनमधील गुन्हे पथकानं ही कामगिरी केली आहे. हेही वाचा...रेस्टॉरंट, जिम, प्रार्थनास्थळं? नव्या संशोधनानुसार ‘या’ ठिकाणी Covid ची शक्यता वळगाव येथील माँ पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये नोंनफेरस मेटल या कंपनीचे गोदाम आहे. या गोदामात 8 नोव्हेंबरच्या रात्री शटरचे लॉक तोडून टंगस्टन कार्बाईड या नावाचं 12.3 टन वजनाचा मौल्यवान धातू चोरीस गेला होता. कंपनीचे मालक निखिल नरेंद्र दुबल यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात 12 नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली. नंतर पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकातील पोलीस उपनिरीक्षक पुष्पराज सुर्वे, पोलिस हवालदार अशोक बोडके राजेश गावडे, लक्ष्मण सहारे, सुनील शिंदे, प्रवीण सोनवणे, पारस बाविस्कर, विजय ताठे या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छडा लावला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अवघ्या 12 तासांत या गोदामात काम करणारा सोहनसिंग राजपूत व त्याचे साथीदार भंगार व्यावसायिक तारासिंह भैरवसिंह परमार, हिरासिंह भैरवसिंह परमार या दोघा भावांना राहनाळ येथून अटक केली. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी त्यांनीच केल्याचं समोर आलं. पोलिसांनी आरोपींनी लपवू ठेवलेला 1 कोटी, 35 लाख, 1 हजार 912 रुपये किमतीचा 12.3 टन वजनाचा मौल्यवान धातू टंगस्टन कार्बाईडचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दुसरीकडे, पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ऐन दिवाळीत पुण्यात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. गावठी पिस्तूल आणि काडतुसं विकणाऱ्या लादेन टोळीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 11 पिस्तुल आणि 31 काडतुसं जप्त करण्यात आले आहेत. बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव, बल्लूसिंग पारसे, लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी, संदीप धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. हेही वाचा...पुण्यातील मेहुण्यानं केला ट्रिपल मर्डर, चेन्नई पोलिसांनी फिल्मी फिल्मी स्टाईल... खुनाचा प्रयत्न करणारा स्वारगेट पीएमपीएल बसस्टॉपवर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, कर्मचारी ज्ञाना बडे, मानिज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बारक्या उर्फ प्रमोदला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 पिस्तुल आणि 4 काडतुसं जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने राजू जाधव याने 13 गावठी पिस्तुल बल्लूसिंग याच्याकडून आणल्याची माहिती मिळाली.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या