'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'

'उद्धव ठाकरेंकडून माझी हकालपट्टी मान्य पण भाजप उमेदवाराला विरोधच'

शिवसैनिकांवर गेल्या 5 वर्षांपासून भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात मी आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना पाठिंबा देणार नाही'

  • Share this:

रवि शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 10 एप्रिल : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली हकालपट्टी मान्य आहे. मात्र, भाजप खासदार कपिल पाटील यांना कायम विरोध असणार अशी स्पष्ट भूमिका भिवंडी लोकसभाचे शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी मांडली आहे.

भिवंडी लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने  म्हात्रे यांची शिवसेनेच्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. यानंतर सुरेश म्हात्रे यांच्या मानकोली नाका इथल्या ऑफिसवर शेकडो कार्यकर्त्यांनी धाव घेतली.

या बाबत सुरेश म्हात्रे यांच्याशी न्यूज 18 लोकमतने संपर्क साधला असता, उद्धव ठाकरे यांचा निर्णय मला मान्य आहे. मात्र, शिवसैनिकांवर गेल्या 5 वर्षांपासून भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी केलेल्या अन्यायाच्या विरोधात मी आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना पाठिंबा देणार नाही' असं सुरेश म्हात्रे म्हणाले आहेत. तर यासंदर्भात 'मी माझी भूमिका येत्या शुक्रवारी मांडणार' असल्याचंही सुरेश म्हात्रे म्हणाले आहेत.

सुरेश म्हात्रे यांच्या बंडामुळे शिवसैनिक काय भूमिका घेणार आणि भाजपला किती मोठा धक्का बसणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांचा भाजपप्रवेशाचा मुहूर्त ठरला...PM मोदींच्या उपस्थितीत हाती घेणार 'कमळ'

कसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीला मोठा धक्का बसलाय. राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.  भाजपचे उमेदवार  सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत. तर 17 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अकलुज येथील सभेत विजयसिंह मोहिते पाटील भाजपप्रवेश करणार आहेत.

मुलांपाठोपाठ हे ज्येष्ठ नेतेही करणार भाजप प्रवेश

राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आधीच भाजप प्रवेश केला आहे. मुलांपाठोपाठ आता हे पितादेखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे महाआघाडी मोठा धक्का मानला जात आहे.

विखे पाटील म्हणाले होते.. काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार

राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबुली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

विखे पाटील म्हणाले, काँग्रेस पक्षात काय सुरू आहे याचा विचार पक्षातल्याच नेत्यांनी केला पाहिजे. सुजयने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे. त्याने पूर्ण जबाबदारीने तो निर्णय घेतला आहे. गेली तीन वर्ष तो या भागात काम करतो आहे. राष्ट्रवादीने सामंजस्य दाखवलं असतं तर आघाडीला झटका बसला नसता.


VIDEO: रामदास आठवलेंनी वर्तवलं पवारांच्या बालेकिल्ल्याचं भाकीत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 04:37 PM IST

ताज्या बातम्या