06 डिसेंबर, भिवंडी : ओवळी-मानकोली भागात लागलेल्या आगीत आतापर्यंत 16 गोदामे जळून खाक झालीत. ही आग विझवण्यासाठी 12 अग्निशामक दलाच्या गाड्यावरील जवान शर्थीचे प्रयत्न करताहेत. ही सर्व गोदामे प्लास्टिक, कच्च्या मालाची असल्याची माहिती मिळत आहे. भिवंडीतील ओवळी ग्रामपंचायत हद्दीतील ही घटना आहे. या अग्नितांडवामुळे या परिसरात धुरांचे लोट हवेत पसरलेत.
सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोदामांना ही भीषण आग लागली. सागर कॉम्लेक्स येथील बी-1 मधील 11 गोदामांना आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे, कल्याण व भिवंडी मनपाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा