निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांकडून भिवंडीकरांवर आश्वासनाचा पाऊस

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांकडून भिवंडीकरांवर आश्वासनाचा पाऊस

भिवंडी परिसरातल्या साठ गावांमध्ये देशातलं आधुनिक लॉजिस्टिक पार्क उभारण्याचा सरकारचा विचार आहे

  • Share this:

08 एप्रिल :भिवंडी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीकरांवर आज आश्वासनांचा पाऊस पाडला.. देशाच्या लॉजीस्टिकचे भिवंडी हे मुख्य केंद्र बनेल या माध्यमातून भुमिपुत्रांचे हित साधण्यासोबतच तब्बल 10 लाख बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल अशी घोषणा मुख्यमंत्री  फडणवीस यांनी केलीय..

मुंबई नाशिक महामार्गावरील ठाणे-भिवंडी बायपासवरील माणकोली नाका येथे `एमएमआरडीए'ने उभारलेल्या उड्डाणपुलाच्या उजव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांनी अनेक आश्वासने दिली. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबई आणि परिसरातील वाहतुकीच्या समस्येकडे लक्ष देणे आवश्यक आहे,  हे लक्षात घेऊन आम्ही मेट्रोला प्राधान्य द्यावयाचं ठरवलंय. गेल्या १० वर्षांत १० किमी मेट्रोचे कामही झाले नव्हते ते आम्ही २ वर्षांत प्रत्यक्ष १२० किमीचे काम सुरूही झाले आहे. ठाणे-कल्याण-भिवंडी भागात ५५९ कोटींचे ५ उड्डाणपूल बनवण्यात येत आहेत. नजीकच्या काळात वंजारपट्टी, राजीव गांधी चौक ते साईबाबा मंदिर, ठाणे-भिवंडी, माणकोली- मोटा गाव अशा या वाहतूक प्रकल्पांमुळे या भागातील दळणवळण सुरळीत होऊन वाहतूकही वेगवान होईल असं मुख्यमंत्री म्हणाले.

मेट्रोमुळे कसा फरक पडतोय हे स्पष्ट करतांना मुख्यमंत्री म्हणाले की, २ कोटी मोठ्या झाडांमुळे जितके कार्बन फूट प्रिंट कमी होतील तितके कार्बन फूट प्रिंट मेट्रोच्या मार्गांमुळे कमी होतील. त्यामुळे पर्यावरणाला पूरक अशी ही वाहतूक प्रणाली एकात्मिक रीतीने विकसित करण्याचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुंबई- ठाणे-कल्याण-भिवंडी- भाईंदर अशी एकात्मिक आणि सर्क्युलर वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाईल, त्यामुळे एमएमआरमधली सगळी छोटी मोठी शहरे जोडली जातील. यासाठी दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनला सर्वेक्षणाचे काम दिलं आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या