पोलिसाने तरुणी बनून युवकाशी केलं रोमँटिक चॅटिंग, अश्लील मेसेज पाठवून विश्वास जिंकला; आणि...

पोलिसाने तरुणी बनून युवकाशी केलं रोमँटिक चॅटिंग, अश्लील मेसेज पाठवून विश्वास जिंकला; आणि...

पोलिसांनी चक्क तरुणी होऊन केल्या युवकाशी रोमँटिक गप्पा, असं प्रकरण जे वाचून तुम्हाला धक्का बसेल.

  • Share this:

भिलाई, 24 फेब्रुवारी : पोलिसांनी (Police) तरुणी बनून एका युवकाशी जवळीक साधली आणि त्यानंतर असं काही केलं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. खरंतर खटले सोडवण्यासाठी पोलिसांना वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करावा लागतो. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दुर्ग (Durg) जिल्ह्यातील भिलाई (Bhilai) येथे अशीच एक बाब समोर आली आहे. हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे काम भिलाई नगर (Bhilai Nagar) पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांच्या पथकावर सोपविण्यात आले होते. तपासणीसाठी झारखंड, बिहार आणि नागपूर येथे वेगवेगळी पथकं गेली, परंतु पोलिसांना या अल्पवयीन मुलाचा कोणताही शोध लावता आला नाही. अशा परिस्थितीत एका फोन कॉलमुळे पोलिसांच्या आशा वाढल्या आणि त्यानंतर अल्पवयीन मुलाची सुटका करण्याचं काम सुरू झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 11वी मध्ये शिकणारा एका अल्पवयीन तरुण पीजी रुममधून एक दिवस अचानक गायब झाला. विद्यार्थ्याच्या मोठ्या भावाने अपहरणाची शंका व्यक्त करत भिलाई नगर पोलिसांत तक्रार दाखल केली. दोन्ही भाऊ बिहारमधील गया येथून शिक्षण घेण्यासाठी भिलाई येथे आले होते. दोघेही भिलाई नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पीजी रूममध्ये राहतात. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला, परंतु काही कळू शकले नाही.

विद्यार्थ्याने केला नातेवाईकांना फोन

भिलाई नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दरम्यान बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलाचा फोन गया येथील त्याच्या नातेवाईकांकडे आला. याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने पुन्हा या क्रमांकावर कॉल केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या अल्पवयीन मुलास कोणताही धोका नाही, म्हणून खबरदारी म्हणून पोलिसांनी कोणताही दबाव निर्माण केला नाही.

इतर बातम्या - मुलाने डोळ्यांदेखत पाहिले आईचे अनैतिक संबंध, नवऱ्याला कळायच्या आत असं संपवलं

अशात विद्यार्थ्यासोबत बोलणं करण्यासाठी पोलिसांनी वेगळी पद्धत अवलंबली. एका पोलीस कर्मचाऱ्याने मुलगी बनून नंबरवर मेसेज केला. थोड्या वेळाने त्याचं उत्तर आलं. यानंतर संभाषण सुरू झालं. दरम्यान, बोलणार्‍या तरूणाला आत्मविश्वासाने घेण्याच्या दृष्टीने रोमँटीक गोष्टीही बोलण्यात आल्या. जेव्हा त्या तरुणाला खात्री झाली की तो मुलीशी बोलत आहे, तेव्हा त्याने आपला पत्ता सांगितला.

त्यानंतर पोलिसांचं पथत झालं मुंबईला रवाना

भिलाई नगर पोलीस ठाण्यात तैनात एएसआय दयाशंकर पांडे आणि प्रिन्सिपल कॉन्स्टेबल मुरलीधर कश्यप यांना मुंबईतील ताडदेव पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. दयाशंकर पांडे यांनी सांगितले की, तिथे पोहोचल्यावर असं आढळले की, ज्या अल्पवयीन मुलाबरोबर पोलीस बोलत होते तो खोलीतच राहतो आणि वॉचमेनची नोकरीदेखील करतो. 21 फेब्रुवारीला त्या अल्पवयीन मुलाला तेथून सोडविण्यात आले आणि भिलाई येथे आणण्यात आले. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्याला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

इतर बातम्या - दिल्लीच्या मौजपूरमध्ये दगडफेक; पोलिसांनी केला लाठीचार्ज, तणावपूर्ण वातावरण

नाही सहन करू शकला विज्ञानाचा दबाव

मुलाने पोलिसांना सांगितले की, तो भिलाई येथील एका खासगी शाळेत शिकतो. इयत्ता 11 वी मध्ये विज्ञानाचा दबाव सहन करण्यास तो सक्षम नव्हता. त्याला खूप कठीण वाटत होते. विशेषतः भौतिकशास्त्र विषय. म्हणूनच तो न सांगताच मुंबईला गेला. त्याने तेथे सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास सुरवात केली. बेपत्ता झाल्यापासून एका महिन्यातच पोलिसांनी या अल्पवयीन मुलाची सुटका केली.

इतर बातम्या - सैराट पार्ट-2! लेकीसोबत प्रेमविवाह केला म्हणून जावयाला बनवला कुत्रा आणि...

First published: February 24, 2020, 1:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading