मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /जात प्रमाणपत्रासाठी कुत्र्याचा अर्ज; फोटो, काम आणि पालकाचं नाव वाचून पोट धरून हसाल

जात प्रमाणपत्रासाठी कुत्र्याचा अर्ज; फोटो, काम आणि पालकाचं नाव वाचून पोट धरून हसाल

इथं एका कुत्र्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. अर्ज पाहून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इथं एका कुत्र्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. अर्ज पाहून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

इथं एका कुत्र्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. अर्ज पाहून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    आपल्याला उच्च शिक्षणासाठी, विशेष कोट्यातील नोकरीसाठी जात प्रमाणपत्र लागतं. ते आपण संबंधित कार्यालयातून काढून घेतो. पण, जात प्रमाणपत्र प्राण्यांसाठी असतं का? एखाद्या प्राण्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे? असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर, आता हे सांगण्याचं कारण म्हणजे चक्क एका कुत्र्यानं जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. हा प्रकार बिहारच्या गया जिल्ह्यात घडला आहे. इथं एका कुत्र्याने जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे. अर्ज पाहून प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसला आहे. अर्जात कुत्र्याचं आधारकार्डही जोडण्यात आलं आहे. हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे.

    गया जिल्ह्यातील गुरारु झोनल ऑफिसमध्ये हा अर्ज आला आहे. या कुत्र्याने अर्जात आपलं नाव, पालकांचं नाव आणि घराचा पत्ताही लिहिला असल्याचे सांगण्यात येत आहे. कुत्र्याने आपली जात मागासवर्गीय लिहिली आहे. कुत्र्याचं नाव टॉमी, आईचे नाव गिन्नी आणि वडिलांचे नाव शेरू आहे. लिंग पुरुष असं लिहिलं आहे आणि पत्त्यामध्ये गाव पांडेपोखर, पंचायत रौना, प्रभाग क्रमांक 13 सर्कल गुरारू ठाणे कोंच असे लिहिले आहे. त्यात अर्जदाराची जन्मतारीख 14 एप्रिल 2022 लिहिली आहे. कामाच्या सेक्शनमध्ये विद्यार्थी लिहिलं आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर सर्वच अधिकारी गोंधळले आहेत. आता हा अर्ज कोणी केलाय, याचा शोध अधिकारी घेत आहेत.

    हेही वाचा : 22 वेळा तिने...; बेडरूममध्ये Girlfriend च्या 'त्या' कृत्यामुळे सीरिअल किलर Boyfriend चा गेला जीव

    ऑफिसमध्ये हा अर्ज आल्यानंतर याबाबत शहरात माहिती पसरली आहे आणि या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. मात्र, हा अर्ज तपासल्यानंतर अधिकाऱ्यांनी तो रद्द केला आहे. अर्ज करताना वापरलेलं आधार कार्डही बनावट असल्याचं आढळून आलं आहे. गुरारुचे सर्कल ऑफिसर संजीव कुमार त्रिवेदी यांनी याबद्दल भाष्य केलंय. कोणीतरी ही मस्करी केल्याचं त्यांनी म्हटलंय. अर्जाबरोबर दिलेला मोबाईल क्रमांक राजा बाबूच्या नावाने असल्याचं समोर आलंय. सध्या अर्जदाराची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी मस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

    दरम्यान, कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी हा अर्ज कोणी आणि कुठून केला याचा शोध आता अधिकारी घेत आहेत. याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. जिल्ह्यातीलच काही तरुणांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे. अधिकारी लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि कारवाई करतील, असं म्हटलं जात आहे.

    First published:

    Tags: Viral