महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

महागड्या गाड्या आणि घड्या, भय्यूजी महाराजांची आलिशान लाईफस्टाईल

साधू-संताप्रमाणे ते भगव्या कपड्यात कधी राहिले नाही. त्यांनी आपला पेहराव हा माॅर्डन असाच ठेवला होता.

  • Share this:

इंदूर, 12 जून : आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. तणावाखाली येऊन आत्महत्या केली असं त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिलंय. पण, भय्यूजी महाराजांची रिअल लाईफ शानशौकीन होती.

भय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू होते पण त्यांचं आयुष्य हे एैशो आरामात होतं.  भय्यूजी महाराजांना महागड्या गाड्यांची हौस होती. त्यांच्याकडे अनेक महागड्या आणि नामांकित कंपन्यांच्या गाड्या होत्या. तसंच त्यांना महागड्या गाड्यांसोबतच स्वीस घड्यांचा छंद होता.

त्यांच्या  श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या संपत्तीबद्दल कुणी काही विचारलं तर ते बोटावर मोजून आकडे सांगत होते. भय्यूजी महाराज हे आपल्या धार्मिक आणि सामाजिक कार्याचा आढावा देत होते.

साधू-संताप्रमाणे ते भगव्या कपड्यात कधी राहिले नाही. त्यांनी आपला पेहराव हा माॅर्डन असाच ठेवला होता. त्यांना इंग्रजी, हिंदी, मराठी आणि मालवा क्षेत्रातील भाषेचं ज्ञान होतं.

संबंधीत बातम्या

अाध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची आत्महत्या

फोटो गॅलरी : पंतप्रधान मोदी ते सेलिब्रेटींसोबत भय्यूजी महाराज

हे आहेत भय्यूजी महाराजांचे शेवटचे शब्द, आता कुटुंबाची जबाबदारी घ्या!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 06:06 PM IST

ताज्या बातम्या