मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच....' भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO VIRAL

'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच....' भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO VIRAL

लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे

लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे

लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

मुंबई, 8 जुलै: राजकारण कुठले फासे कधी फिरतील आणि कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा हे कुणीच सांगू शकत नाही. पडद्यामागच्या हालचाली तर अजूनही पूर्वीप्रमाणेच गुलदस्त्यात असतात पण सोशल मीडियामुळे लोकांची स्मरणशक्ती मात्र ताजी राहते याचं एक उदाहरण देणारा दोन वर्षांपूर्वीचा VIDEO मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा VIRAL होत आहे.

लोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे वास्तविक दोन वर्षांपूर्वीचा. पण भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा VIDEO व्हायरल झाला आहे. दोन्ही बाजूंनी अनेक कमेंट्स यावर येत आहेत.

'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच मंत्री झाल्या....', असं म्हणत  भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO काहींनी सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे. हा खरं तर दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ. दिंडोरी मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाबद्दल भारती पवार बोलत होत्या. तिथे 20-25 दिवसांनी एकदा पाणी येतं असं सांगून शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मी फडणवीस साहेब यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या. पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मोदी साहेबांचे आभार मानते त्यांनी जलशक्ती मंत्रालय उभारले, असंही भारती पवार म्हणाल्या. या भाषणादरम्यान मागे बसलेल्या खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना हसू आवरत नव्हतं. 42 सेकंदांच्या या VIDEO मध्ये काही क्षण तर खडसे यांना इतकं हसू आलं की बाकाखाली लपून हसल्या, हेही VIDEO मध्ये दिसलं.

वास्तविक या दोन खासदार भारती पवार यांना हसल्या की आणखी कुठल्या गोष्टीला हे स्पष्ट नाही. शिवाय त्या दोघींमध्ये आधीपासून कुठल्या गोष्टीवर बोलणं सुरू होतं हेही कळायला मार्ग नाही. पण VIDEO चा हा एवढाच तुकडा आता VIRAL होत आहे.

11 बड्या मंत्र्यांचे राजीनामे मागणारा 'तो' एक कॉल कुणी केला

प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी मुंडे समर्थकांची अपेक्षा होती. खडसे किंवा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.

मुंडे भगिनी नाराज?

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत असं काही नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. पण दोन्ही मुंडे भगिनींनी अद्याप काहीच मौनच बाळगलेलं आहे. बहुतेक भाजप नेत्यांनी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन करणारे संदेश किंवा शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर टाकलेले आहेत. पण पंकजा मुंडे अथवा प्रीतम मुंडे यांनी तसं कुणाचंही जाहीर अभिनंदन अद्याप केलेलं नाही. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हाच शेवटचा मेसेज दिसत आहे.

यावरून मुंडे भगिनींच्या मौनाचा काय अर्थ घ्यायचा अशी चर्चा सुरू आहे.

'मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे', अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली.

First published:

Tags: Pankaja munde, Union cabinet