Magsaysay award : सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार

Magsaysay award : सोनम वांगचुक आणि भारत वाटवानी यांना 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार

  • Share this:

मनिला,ता. 26 जुलै : सामाजिक कार्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'रॅमन मॅगसेसे' पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि डॉ. भारत वाटवानी यांना जाहीर झालाय. डॉ. भारत वाटवानी यांनी हजारो मनोरूग्णांचं पुनवर्सन केलं आहे. रस्त्यावर रहाणाऱ्या गरीब निराधार मनोरूग्णांवर उपचार करून त्यांना त्यांच्या कुटूंबियांच्या स्वाधीन करण्याचं काम ते गेली अनेक वर्ष करत आहेत. तर पेशाने इंजिनियर असलेले सोनम वांगचुक यांनी लेह-लद्दाखमध्ये ग्रामविकासाचं आणि शैक्षणीक कार्य केलं आहे. त्यांच्या जीवनावर आधारीत असेलल्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटाने आपला वेगळा ठसा उमटवला होता. या चित्रपटानंतर त्यांच कार्य खऱ्या अर्थाने जगासमोर आलं होतं.

'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

डॉ. वाटवानी आणि त्यांच्या पत्नी यांनी 1988 पासून मनोरूंग्णांवर त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले आणि नंतर श्रद्धा पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. वांगचुक यांनी 1988 मध्ये इंजिनियरींगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लद्दाख (SECMOL) या संस्थेची स्थापना केली. नापास झालेल्या मुलांसाठी त्यांनी लद्दाखमध्ये शाळा काढली.

असा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम, सर्वस्व पणाला लावून पाकचा केला होता पराभव

PHOTOS: मुंबईसारखीच दिल्लीही तुंबली

1994 मध्ये त्यांनी ऑपरेश न्यू होप ही संघटना काढली. फिलीपीन्सचे अध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचं 1957 मध्ये विमान अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. 31 ऑगस्टला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 04:16 PM IST

ताज्या बातम्या