• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • कतरिनाने 'या' नावाने हाक मारलेली सलमानला अजिबात आवडत नाही

कतरिनाने 'या' नावाने हाक मारलेली सलमानला अजिबात आवडत नाही

सलमानला कतरिनाने कोणत्या नावाने हाक मारावं असा प्रश्न विचारला असता सलमानने असं काही उत्तर दिलं की अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

 • Share this:
  मुंबई, 17 मे- सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा आगामी ‘भारत’ सिनेमाचं जिंदा हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं. अगदी थोड्यावेळातच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. हे गाणं प्रदर्शित करण्यासाठी भारतच्या टीमने एक पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी सलमानने त्याच्या मनातली इच्छा बोलून दाखवली. सलमानला कतरिनाने कोणत्या नावाने हाक मारावं असा प्रश्न विचारला असता सलमानने असं काही उत्तर दिलं की अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचं झालं असं की, इन डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कतरिनाने सलमानला कधीही ‘भाईजान’ अशी हाक मारु नये अशी त्याची इच्छा आहे. याउलट तिने ‘मेरी जान’ अशी त्याला हाक मारावी असंही तो म्हणाला. सलमानच्या या उत्तराने त्याच्या बाजूलाच बसलेली कतरिना लाजेने लाल झाली होती. तसेच या सिनेमात कतरिनाने एवढं चांगलं काम केलं आहे की तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळू शकतो असं विधान सलमानने यावेळी केली. अरे देवा! पासपोर्ट होल्डरसाठीही एवढे पैसे खर्च करते दीपिका पादुकोण?
   
  View this post on Instagram
   

  A National Award for Katrina Kaif? Salman Khan thinks so...! ✌🏼 . . #bharat #salmankhan #katrinakaif #zinda #songlaunch #indotcom

  A post shared by IN.com (@indotcom) on

  येत्या ५ जून रोजी भारत सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आज सिनेमाचं चौथं जिंदा हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. अली अब्बास जफर आणि ज्युलियस पॅकियम यांनी मिळून हे गीत लिहिलं असीम विशाल ददलानीने गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात सलमानच्या लहानपणापासून ते म्हातारपणीचा काळ दाखवण्यात आला असून, फाळणीचं दुःखही दाखवण्यात आलं आहे. Cannes 2019 – साडीनंतर कंगनाचा हॉट पार्टी लुकही व्हायरल जिंदा गाण्यात अनेक भावुक करणारे सीन तर आहेतच शिवाय अॅक्शनही पाहायला मिळते. गाण्यात सलमानच्या तोंडी अनेक दमदार संवादही आहेत.  अली अब्बास जफर दिग्दर्शित या सिनेमात १९४७ ते २०१० पर्यंतचा काळ दाखवण्यात आला आहे. तसेच बदलत्या काळासोबत भारतचं (सलमान खान) बदलतं आयुष्यही दाखवण्यात आलं आहे. Cannes 2019 – रेड कार्पेटआधीच मल्लिका शेरावतने दाखवली तिच्या लुकची झलक
  First published: