लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत भावुक झाला सलमान खान, म्हणाला...

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत भावुक झाला सलमान खान, म्हणाला...

माझ्या एण्ट्रीच्यावेळचं हे गाणं असून लक्ष्मीकांत आणि माझ्यावर ते चित्रीत करण्यात आलं होतं. मी त्यांच्यासोबत अनेक सिनेमे केले.

  • Share this:

मुंबई, 25 मे- सध्या सलमान खान त्याच्या आगामी 'भारत' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमासाठीच तो 'सारेगामाप लिटिल चॅम्प' या रिअलिटी शोच्या विशेष भागात गेला होता. यावेळी त्याच्या अनेक सिनेमांमधील गाणी गायली गेली. दरम्यान, ऋतिक गुप्ता या स्पर्धकाने सलमानच्या 'साजन' सिनेमातील 'तुमसे मिलने की तमन्ना है' हे गाणं गायलं. हे गाणं ऐकल्यानंतर सलमानला दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण झाली. या गाण्यात लक्ष्मीकांत आणि सलमान दोघांनी स्क्रीन शेअर केली होती.

शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

लक्ष्मीकांत यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत सलमान म्हणाला की, ‘या गाण्यासोबत अनेक चांगल्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. 'साजन' सिनेमातलं हे गाणं आहे. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. माझ्या एण्ट्रीच्यावेळचं हे गाणं असून लक्ष्मीकांत आणि माझ्यावर ते चित्रीत करण्यात आलं होतं. मी त्यांच्यासोबत अनेक सिनेमे केले. 'मैंने प्यार किया' सिनेमाच्या यशात त्यांचा फार मोठा वाटा आहे असं मला नक्कीच वाटतं. हे गाणं मला नेहमी त्यांची आठवण करून देतं. आज ते आपल्यात नाही.’

टाइट ड्रेसमुळे बेशुद्ध झाली ही मॉडेल

१५ वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी घेतला अखेरचा श्वास

लक्ष्मीकांत यांनी सलमानसोबत 'मैंने प्यार किया', 'साजन', 'हम आपके है कौन' आणि 'हम तुम्हारे है सनम' सिनेमात एकत्र काम केलं. 16 डिसेंबर २००४ रोजी प्रदीर्घ आजाराने त्यांचं निधन झालं. मराठी माणसाला लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव माहीत नाही असं होणं शक्यच नाही. एकाहून एक सरस सिनेमे देणाऱ्या लक्ष्मीकांत यांना विनोदाचा बादशहा असंही म्हटलं जायचं.

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

VIDEO: सुरतमधील भीषण आग प्रकरण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

First published: May 25, 2019, 3:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading