नवी दिल्ली, 31 डिसेंबर: पाच दिवसांपूर्वीच भारतातील लहान मुलांच्या लसीकरणाचा (Children corona vaccination) मार्ग मोकळा झाला आहे. लहान मुलांनाही कोरोना लस मिळणार आहे. भारत बायोटेकची लस लहान मुलांना देण्यासाठी मोदी सरकारने परवानगी दिली.
हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस ही सध्या देशात दिली जात आहे. याच संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. लस निर्माता कंपनी भारत बायोटेकने (Bharat Biotech) लहान मुलांसाठी Covaxin सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.
भारत बायोटेकने गुरुवारी सांगितले की, BBV152 (कोव्हॅक्सीन) लस सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. तसंच मुलांमध्ये फेज II आणि फेज III च्या अभ्यासात चांगली प्रतिकारशक्ती प्रदान करते.
Bharat Biotech says its Covaxin has proven to be safe, well-tolerated, and immunogenic in 2-18 years old volunteers in phase II/III study pic.twitter.com/hm5HQrz8F3
— ANI (@ANI) December 30, 2021
भारत बायोटेकने सांगितले की, भारत कंपनीने 2-18 वर्षे वयोगटातील निरोगी मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये लसीची सुरक्षितता, प्रतिसाद आणि प्रतिकारशक्तीचे मूल्यांकन करण्यासाठी फेज II आणि III चा स्वतंत्र अभ्यास केला आहे.
दोन वर्ष ते 18 वर्ष मुलांवरील Covaxin च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. तसंच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील चाचणीत दोन वर्ष ते 18 वर्ष मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढलीआहे. त्यामुळे लहान मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला म्हणाले की, लहान मुलांमध्ये कोवॅक्सीनचा क्लिनिकल चाचणी डेटा खूप उत्साहवर्धक आहे. मुलांसाठी लसीची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि आम्हाला कळवण्यास आनंद होत आहे की, कोवॅक्सीन आता मुलांमध्ये सुरक्षितता आणि प्रतिकारशक्तीच्या बाबतीत श्रेष्ठ असल्याचे सिद्ध झाले आहे. आम्ही आता प्रौढ आणि मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी COVID-19 लस विकसित करण्याचे आमचे ध्येय साध्य केले आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात Lockdown लागणार?, मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत साडेतीन तास बैठक
या वर्षी जून-सप्टेंबर दरम्यान मुलांवर झालेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये मजबूत संरक्षण आणि प्रतिकारशक्ती दिसून आली आहे. त्याचा डेटा ऑक्टोबर 2021 मध्ये सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडे सबमिट करण्यात आला होता आणि अलीकडेच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 12-18 वयोगटातील मुलांसाठी कोवॅक्सीनच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली. कंपनीच्या वतीनं असं सांगण्यात आलं की, लसीच्या अभ्यासात कोणतीही गंभीर प्रतिकूल घटना नोंदवली गेली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus cases