मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाचं 100 वर्ष जुनं ब्रिटिश कनेक्शन

Bharat Bandh : शेतकरी आंदोलनाचं 100 वर्ष जुनं ब्रिटिश कनेक्शन

साधारण 100 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पंजाबातला शेतकरी तत्कालीन ब्रिटीश सरकारविरोधात पेटला होता.. काय आहे त्या आणि या आंदोलनातलं (Farmers' protest ) साम्य?

साधारण 100 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पंजाबातला शेतकरी तत्कालीन ब्रिटीश सरकारविरोधात पेटला होता.. काय आहे त्या आणि या आंदोलनातलं (Farmers' protest ) साम्य?

साधारण 100 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे पंजाबातला शेतकरी तत्कालीन ब्रिटीश सरकारविरोधात पेटला होता.. काय आहे त्या आणि या आंदोलनातलं (Farmers' protest ) साम्य?

नवी दिल्ली, 8 डिसेंबर : शेतकरी आंदोलन (farmer's protest) संपूर्ण देशभर पसरलं आहे. भारत बंदलाही (Bharat Bandh) अनेक राज्यांमधून प्रतिसाद मिळाल्याने या आंदोलनाची धग आणखी पसरली. यामुळे एका आंदोलनाची सारखी आठवण होत आहे. अनेक जण शेतकरी आंदोलनाच्या 100 वर्षापूर्वीच्या कनेक्शनसंदर्भात बोलत आहेत. तत्कालीन ब्रिटीश सरकारचं धाबं दणाणलं होतं त्या शेतकरी आंदोलनाने. काय होतं ते पंजाबी शेतकऱ्यांचं आंदोलन आणि त्याचा या सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी काय आहे संबंध?

‘पगडी संभाल जट्टा’ (Pagari Sambhal Jatta) नावाचं हे आंदोलन किमान 100 वर्षापूर्वी पंजाबमध्ये (Punjab) झालं होतं. त्या वेळच्या ब्रिटिश सरकारचं (British Government) धाबं दणाणले होते. पंजाबच्या घराघरातून लोक ‘पगडी संभाल जट्टा’ हे गीत गात मोठ्या संख्येने सरदार शेतकरी बाहेर पडले होते.

ही साल 1907 मधली गोष्ट आहे. जेव्हा इंग्रजांनी एका पाठोपाठ एक असे तीन कायदे बनविले होते, यामुळे शेतकरी पूर्णपणे गुलाम झाला असता. हे तीन कायदे होते, दोआब बारी ॲक्ट, पंजाब लँड कॉलोनाइजेशन ॲक्ट आणि पंजाब लँड एलियनेशन ॲक्ट (Agricultural Act). या कायद्याच्या अंतर्गत कालवे बांधून विकास करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कमी किमतीत त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या. बर वेगवेगळ्या प्रकारचे कर लावण्यात आले. क्रांतिकारक भगतसिंगांचे काका अजितसिंग यांनी याविरुद्ध आंदोलन सुरू केले. मात्र या आंदोलनाला ‘पगडी संभाल जट्टा’ असे एकदम वेगळे नाव एका पत्रकाराने दिले.

मार्च 1907 ल्यालपुर (आताचा पाकिस्तान) एक मोठी रॅली झाली. तेव्हा तिथे झांग स्याल नावाचे वर्तमानपत्र चालत असे. त्याचे एडिटर होते, बांके दयाल. त्यांनी हे नवीन गाणं गायलं- पगडी संभाल जट्टा, पगडी संभाल. पगडी पंजाबी शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे गाण्याचे बोल त्यांच्या सन्मानाची जोडले गेले. काही काळातच हे गाणे खूप प्रसिध्द झाले. त्यामुळेच आंदोलनाचे नाव ‘पगडी संभाल जट्टा’ पडले.

पगडी संभाल आंदोलनाचे जनक अजित सिंग (Ajit Sing)

आज जसे दिल्लीत (Delhi) शेतकरी आंदोलन करत आहेत तसेच आंदोलन तेव्हा झाले होते. शेतकऱ्यांनी तेव्हा ठरवलं होत, आंदोलनाच्या आधी बिल वाचून दाखवले गेले पाहिजे, जेणेकरून आंदोलनाचा भाग झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला या कायद्यामुळे होणारे नुकसान लक्षात येईल. या आंदोलनाचे जनक अजितसिंग यांनी त्यांची आत्मकथा 'Buried Alive' मध्ये ह्या घटनेचा उल्लेख केला आहे.

आताच्या पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी यामध्ये सहभागी झाले होते परंतु ल्यालपुर या आंदोलनाचे केंद्र बनले होते. याचे कारण असे होते की, ह्या दोन्ही राज्यांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात होते. त्याचबरोबर इथे झालेले फौजी पण राहत होते. माजी फौजी सध्या फौजी असलेल्यांना आपल्या सोबत घेऊन येतील असं व्यवस्थित नियोजन त्या वेळी केलं होतं.

हे दिल्ली सध्या होत असलेल्या शेतकरी आंदोलनाशी मिळते-जुळते आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, कृषी कायदा त्यांना त्यांची शेती आणि जमिनी कॉर्पोरेट्स विकण्यासाठी भाग पाडेल. जशा कालव्यांच्या नावाखाली ब्रिटिशांनी त्यांच्या जमिनी घेतल्या होत्या तसाच हा प्रकार आहे.

आता ज्याप्रकारे दिल्लीत शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्याहून मोठ्या प्रमाणात तेव्हा आंदोलन झाले होते.

पूर्वनियोजित या आंदोलनात ब्रिटिश सरकारला त्रासलेले सामान्य लोकसुद्धा सहभागी झाले होते आणि त्याचा परिणामही दिसला. त्यांनी कायद्यात काही बदल केले. त्याचबरोबर आंदोलनाचा मुख्य चेहरा अजितसिंग यांना जवळजवळ 40 वर्ष देशातून बाहेर काढण्यात आहे. त्यानंतर अजितसिंग अफगानिस्तान, इराण, इटली आणि जर्मनीपर्यंत गेले आणि आपला लढा चालू ठेवला.

आताच्या शेतकरी आंदोलनात केंद्र सरकार शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे, असे दिसत आहे. पुढील बैठकांमध्ये यावर काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा आहे.

पगडी संभाल जट्टा आंदोलनाची सुरुवात अजितसिंग यांनी केली होती परंतु देशातील अनेक प्रमुख क्रांतिकारी या सहभागी झाले. या कायद्यात थोडी सवलत ब्रिटिश देतील ही बातमी लाला लजपत राय (Lala Lajapat Ray) यांना आधीच माहीत होती. पहिले त्यांनी हे आंदोलन थांबवायचा प्रयत्न केला तर त्यांना कळले की हे आंदोलन शेतकऱ्यांपुरते मर्यादित राहणार नाही, ब्रिटिश सरकारला देशातून घालवण्यास या आंदोलनामुळे मदत होईल.

मुल्तानमधील रेल्वे कर्मचारी आंदोलनसाठी निघाले होते

1907 मध्ये शेतकरी आंदोलन आणि चालू असलेले आंदोलन यांमध्ये बरेच साम्य होतं तसंच खूप तफावतसुद्धा होती. सध्या चालू असलेले प्रदर्शन बऱ्याचअंशी शांतीपूर्वक आहे आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेची घटना घडली नाही. पण पगडी संभाल जट्टा या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसा झाली होती. ब्रिटिशांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी रावळपिंडी, गुजरावाला आणि लाहोरमध्ये हिंसक प्रदर्शन केले होते. त्यांना ब्रिटिशांनी मारहाण करण्यात आली होती अपमान करण्यासाठी त्यांच्यावर चिखल सुद्धा फेकण्यात आला होता.

छोट्या मोठ्या मारामारीबरोबर मोठ्या प्रमाणात हिंसा सुद्धा झाली होती. कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला होता आणि तार यंत्रणेच्या लाईन खराब करण्यात आल्या होत्या. लाहोरमध्ये एसपीला मारण्यात आले होते. मुल्तानमधे शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी रेल्वे कर्मचारी संपावर गेले होते आणि कायद्यात बदल झाल्यावर कामावर रुजू झाले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांना मुंबई (Mumbai) (तेव्हाचे बॉम्बे/Bombay) पाठवून दिले होते, जेणेकरून परिस्थिती गंभीर झाल्यावर त्यांना इंग्लंडला पाठविण्यात येईल.

आंदोलनात घडलेल्या सर्व घटनांची माहिती अजितसिंग यांनी आपल्या आत्मकथेत दिली आहे. यानंतर ब्रिटिशांना समजले की शेतकऱ्यांचा हा राग फक्त एका कायद्यासाठी नव्हता परंतु त्यांच्या सरकारविरुद्ध होता. अशाप्रकारे पगडी संभाल आंदोलन देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा एक भाग बनला.

First published:

Tags: Protesting farmers