इंधन दरवाढ सुरूच, १० सप्टेंबरला काँग्रेसची भारत बंदची हाक

इंधन दरवाढ सुरूच, १० सप्टेंबरला काँग्रेसची भारत बंदची हाक

  • Share this:

मुंबई, ६ सप्टेंबर :  इंधनाच्या दरवाढीचा आज सलग चौदाव्या दिवशी भडका उडाला. इंधन दरवाढ आणि रुपयाचं अवमूल्यन असं दुहेरी संकट घोंघावत आहे. इंधन दरवाढीबद्दल सरकारला जाब विचारत आज काँग्रेस आक्रमक झाली. इंधनाची दरवाढ सुरूच असून गुरुवारी मुंबईत पेट्रोल १९ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत अस नं इंधनाचा भडका उडतो आहे, तर दुसरीकडे दिवसेंदिवस रुपयाचं अवमूल्यन होतंय.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये आता जणू दरवाढीची स्पर्धाच लागलीय..आज औरंगाबादमध्ये सर्वोच्च दरानं पेट्रोल विकलं जातंय...औरंगाबादेत 87.96 पैशांनी पेट्रोल विकलं जातंय...त्यामुळे पंतप्रधान मोदींनी दिलेला अच्छे दिनचा शब्द नेमका सत्यात कधी उतरणार असा सवाल सर्वसामान्य विचारतायत.

इंधनाच्या दरात वाढ सुरुच असून गुरुवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटरमागे १९ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २२ पैशांनी महागलं.

मुंबईत गुरुवारी पेट्रोलने एका लिटरसाठी ८६. ९१ रुपये इतका दर गाठला. तर डिझेलने एका लिटरसाठी ७५. ९६ रुपये इतका दर गाठला. दिल्लीतही पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ५१ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७१. ५५ रुपये इतके आहे.

आता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत!

Section 377 : Supreme Court च्या ऐतिहासिक निर्णयातल्या 10 महत्वाच्या गोष्टी

 

First published: September 6, 2018, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading