News18 Lokmat

सैन्यात नोकरीचे आमिष दाखवून भामट्याने तरुणांना दीड कोटींना फसवले

आसाम रायफल येथे नर्सिंग असिस्टंटची नोकरी लाऊन देण्याच्या नावावर 27 बेरोजगारांकडून 1 कोटी 40 लाख 40 हजार रूपयाची फसवणूक केल्याच्या प्रकार मोहाड़ी तालुक्यात नुकताच उघड झाला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 2, 2018 10:32 PM IST

सैन्यात नोकरीचे आमिष दाखवून भामट्याने तरुणांना दीड कोटींना फसवले

भंडारा, 02 जुलै : नोकरी लाऊन देण्याच्या आश्वासन पोटी पैसे देण्याच्या विचार करताय, तर सावधान!!!ही बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडू शकते. भंडारा जिल्ह्यातील मोहाड़ी तालुक्यातील एका ठगाने नोकरी लाऊन देण्याच्या बहान्याने बेरोजगारांच्या हजार नव्हे,लाख नव्हे चक्क 1 कोटी 40 लाख रूपयांवर डल्ला मारला आहे.

आसाम रायफल येथे नर्सिंग असिस्टंटची नोकरी लाऊन देण्याच्या नावावर 27 बेरोजगारांकडून 1 कोटी 40 लाख 40 हजार रूपयाची फसवणूक केल्याच्या प्रकार मोहाड़ी तालुक्यात नुकताच उघड झाला असून मोहाड़ी पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून गुन्हा दाखल केला असून आरोपी ठगबाज माजी सैनिक सहादेव ढेंगे पोलिसांनी शिताफिनी अटक केली आहे.

मोहाड़ी तालुक्यातील हरदौली येथील आरोपी सहादेव ढेंगे हा सेवानिवृत्त सैनिक आहे. त्याने आपल्या इतर साथीदारांसोबत मोहाड़ी,तुमसर येथील श्याम कचरू गायधने आणि नवीन कुमार झंझाड बाइट तरुणांना आसाम रायफल इथं नर्सिंग असिस्टन्टची नोकरी लाऊन देण्याचे आमिष दिले,त्यासाठी प्रत्येक बेरोजगारांकडून 5 लाख रुपये आणि सर्विस बुक करिता 20 हजार रुपये असे प्रत्येकी ऐकूण 5 लाख 20 हजार घेण्यात आले, आसाम रायफलचे बनावट सही आणि सिक्काचे खोटे नियुक्ती पत्र तयार करून पैसे देण्याऱ्या 27 युवकांना हे नियुक्त पत्र देण्यात आले, याशिवाय आसाम राज्यातील जोरहाट येथिल रॉयल इंस्टिट्यूटमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण ही देण्यात आले होते. मात्र जेव्हा हे बेरोजगार जॉइन होण्यासाठी गेले अशी कोणतीही नेमणूक झाली नसल्याचं कळलं,त्यांनी नागपुर जिल्ह्याच्या कामठी मिल्ट्री इंटीजेलन्स विभागात जाऊन चौकशी केल्यानंतर हे नियुक्ती पत्र बनावट असल्याचं कळल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांना लक्षात आले.

आपल्या गावी परतलेल्या युवकांनी संपूर्ण हकीकत घरी सांगत त्या 27 युवकांनी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन युवकांची तक्रार नोंदवून घेत  कलम 420,465, 468,471, 34 अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी सदाशिव ढेंगे याला शिताफीने अटक केली आहे.

हे संपूर्ण प्रकरण भंडारा जिल्हापुरते मर्यादित नसून गोंदिया, नागपुर,जळगाव, धुळे, उत्तरप्रदेश,येथील युवकांना गंडा घातला असल्याने या प्रकरणात गुंतलेल्या इतर आरोपींच्या मागावर पोलीस आहे. या प्रकरणात आरोपी इतर राज्याचे असल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले असून ह्या प्रकरणात मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

Loading...

एकंदरित उज्ज्वल भविष्याची कामना करण्यात आलेल्या या युवकांची मोठी आर्थिक फ़सगत झाली असून आर्मीत जाण्याचे स्वप्न सुद्धा भंगले आहे. शिवाय या 27 युवकांचे मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र,टी सी,गुणपत्रक, जात प्रमाणपत्र आदी महत्वपूर्ण कागदपत्र या भामट्यांच्या ताब्यात असल्याने हे युवक दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज ही करू शकत नाही.

हेही वाचा

होता वसीम म्हणून वाचले 5 हिंदू बांधव!

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

 सतराशे कोटींची जमीन बिल्डरच्या घशात, काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप

  'काँग्रेसवर भाजपचा 500 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2018 10:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...