Home /News /news /

कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नींही पाठिशी, सरकारकडून दिरंगाई होत असल्याने एका दिवसांत शिवले 500 मास्क

कोरोनाच्या लढाईत पोलीस पत्नींही पाठिशी, सरकारकडून दिरंगाई होत असल्याने एका दिवसांत शिवले 500 मास्क

कोरोनाशी लढा देण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. याचं स्तुत्य उदाहऱण भंडाऱ्यातील पोलिसांनी दिलं आहे

    भंडारा, 24 मार्च : महाराष्ट्रातील दुर्गम भागातील एका पोलीस विभागाने कोविड -19 चा (Covid - 19) सामना करताना ते आधीपासूनच तयार असल्याचे एका प्रसंगावरुन दाखवून दिले आहे. सध्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढत असल्याने देशभरातून मोठ्या संख्येने मास्कची मागणी केली जात आहे.   भंडाऱ्यातील (Bhandara Police) पोलीस विभागाने राज्य सरकारकडून तब्बल 1600 मास्कची मागणी केली होती. यासाठी एक आठवड्याचा अवधी लागणार होता. मात्र भंडाऱ्यातील पोलीस विभाग शांत बसला नाही. कोरोनाशी लढा देणाऱ्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. पोलीस दिवसभरात घराबाहेर राहून लोकांना अलर्ट करीत असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मास्क हवे होते. अशावेळी कोणावरही दोष-आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वत:च आपले मास्क शिवून घेतले. यासाठी पोलिसांच्या अर्धांगिनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि दिवसाला सुमारे 500 मास्क शिकून दिले. संबंधित - कर्फ्यूदरम्यान वृद्धांसाठी झटतेय ही तरुणी, सायकलवर फिरणारी तारणहार भंडारा पोलिसांनी समोर ठेवलेलं हे उदाहरण अत्यंत कौतुकस्पद आहे. ऐरवी आपण पोलिसांच्या कामाचं कौतुक करीत असतो. 22 मार्च रोजी टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त केले. मात्र भंडाऱ्यातील पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वच भागातून त्यांचं कौतुक केलं जात आहे. तब्बल 1600 कर्मचार्‍यांना संरक्षण मास्क पोचविण्यासाठी आठवड्याभर थांबण्यास राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. यासाठी गेल्या चार दिवसांपासून चार पोलीस पत्नी आणि दोन पुरुष 12 तासांपासून काम करीत होते. सोमवारी जेव्हा राज्य सरकारकडून मास्क आले तेव्हा त्यांच्याजवळ सुमारे 2,000 हून अधिक मास्क उपलब्ध झाले होते. इंडियन एक्सप्रेस या वृत्तसंस्थेत ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. संबंधित - गरिबांसाठी खाजगी रुग्णालयात कोरोनाची मोफत तपासणी, मोदी सरकार राबवणार विशेष योजना भंडाराचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यावर म्हणाले, 'आमच्याकडे जवळपास 1600 पोलीस कर्मचारी आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक कर्मचार्‍याजवळ प्रत्येकी दोन मुखवटे असायला हवेत. त्यांनी लावलेल्या एका मास्कव्यतिरिक्त अडचणीच्या काळात त्यांच्या सुरक्षेसाठी दुसरा मास्क हाताशी असणं गरजेचं आहे'. भंडाऱ्यात पोलीस पत्नींना शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं जातं. याच शिवणवर्गातून हे मास्क शिवून देण्यात आले. आपले पती कोरोनाविरोधात मोठा लढा देत आहे. यामध्ये त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. यासाठी अवघ्या चार दिवसांत या महिलांनी शेकडो मास्क शिवले. पुष्पा उके यांनी ही जबाबदारी घेत पोलीस पत्नींकडून मास्क शिवून घेतले. कर्फ्यू दरम्यान बाजार बंद होण्यापूर्वी उके यांनी 100 शंभर मीटर हिरव्या कापड आणि बँडची खरेदी केली. उके यांच्या देखरेखीखाली तीन पोलीस पत्नी आणि दोघांनी एका दिवसा  सुमारे 500 मास्क तयार केले. येथील मास्क पुरवठ्याचे प्रमुख असलेले सब-इन्स्पेक्टर राजेश वासनीक यांनी सांगितले की,  'मास्क शिवण्याचे काम सकाळी 7  ते रात्री 8 वाजेपर्यंत चालू असायचं. दुपारी जेवणाचा एक तास सोडला तर महिला पूर्ण वेळ काम करत असायच्या. त्यांनाही माहिती आहे की सध्याच्या परिस्थितीत मास्क किती आवश्यक आहे. शिवाय हे मास्क धुवूनही वापरता येई शकतात. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली आहे. '
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या