LIVE NOW

Bhandara-Gondia By-election Result 2018 : राष्ट्रवादीची विजयाकडे वाटचाल

भाजपचे उमेदवार हेमंत पटले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही उमेदवार माजी आमदार असून, ही जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे.

Lokmat.news18.com | May 31, 2018, 5:27 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated May 31, 2018
auto-refresh

Highlights

5:21 pm (IST)
Load More
भंडारा-गोंदिया, ता. 31 मे : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज होणार आहे. ईव्हीएम मशिन्समधल्या घोळामुळे इथं ४९ ठिकाणी फेरमतदान झाल होतं. आज सकाळी 8 वाजेपासून भंडारा इथल्या बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन इथं मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 6 विधानसभांच्या 6 सर्कल तयार करण्यात आले आहेत. एकूण 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. जवळपास 30 टप्प्यात ही मतमोजणी होण्याची शक्यता आहे. भाजपचे उमेदवार हेमंत पटले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मधुकर कुकडे यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही उमेदवार माजी आमदार असून, ही जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान, भाजपचे नाना पटोले यांनी सरकारविरोधात बंड पुकारत खासदारकीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं या मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल पटेल यांचा पराभव करत पटोलेंनी २०१४ मध्ये ही जागा पटकावली होती. मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असल्याने नाना पटोलेंनी प्रयत्न करूनही काँग्रेसला उमेदवार देता आला नाही. इथं भाजपचे हेमंत पटले, राष्ट्रवादीचे मधूकर कुकडे आणि भारिपचे एल.के मडावी यांच्यात सामना रंगणार आहे. तुमसर, भंडारा, साकोली, अर्जुनी, मोरगाव, तिरोडा आणि गोंदिया हे सहा विधासभा मतदार संघ या लोकसभा मतदार संघात येतात. २८ मे रोजी इथं 38 टक्के मतदान झालंय. भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक - एकूण मतदान - 42.25% - सर्वात जास्त मतदान- साकोली - सर्वात कमी मतदान- भंडारा-गोंदिया - एकूण मतदार- 17 लाख 59 हजार 977 - 18 उमेदवार रिंगणात - एकूण मतदान केंद्र- 2149 - 11 हजार 790 कर्मचारी तैनात - 3 हजार 833 पोलीस तैनात - 49 ठिकाणी फेरमतदान - मतमोजणीचे ठिकाण- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन - एकूण 14 टेबलवर 30 टप्प्यांत होणार मतमोजणी संबंधित बातम्या

भंडारा-गोंदियामध्ये 49 ठिकाणी फेरमतदानात 45.86 टक्के मतदान

भंडारा गोंदियात पहिल्या २ तासात ९.४ टक्के मतदानाची नोंद

भंडारा-गोंदियात 'या' 49 ठिकाणी होणार फेरमतदान,असणार शासकीय सुट्टी

'ईव्हीएम'चा घोळ भोवला, भंडारा-गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

भंडारा गोंदियात 49 ठिकाणी होणार फेरमतदान

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, मतदानाची टक्केवारी घसरली

भंडारा गोंदियात 100 मतदान केंद्रात ईव्हीएममध्ये बिघाड

 
corona virus btn
corona virus btn
Loading